WPL 2024: फायटर 'दिप्ती'ची खेळी व्यर्थ, यूपी वॉरियर्सचा 8 धावांनी पराभव; गुजरातने नोंदवला विजय

WPL 2024, Gujarat Giants vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग 2024 चा 18 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला.
WPL 2024, Gujarat Giants
WPL 2024, Gujarat Giants Dainik Gomantak
Published on
Updated on

WPL 2024, Gujarat Giants vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग 2024 चा 18 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सचा पराभव केला.

दीप्ती शर्माच्या झंझावाती खेळीनंतरही यूपी वॉरियर्सला 8 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर गुजरात जायंट्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, यूपी वॉरियर्सचा पराभव करुनही गुणतालिकेत गुजरात जायंट्स तळाच्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सशिवाय दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफसाठी क्वॉलिफाय केले आहे. तर उर्वरित 1 जागेसाठी 3 संघ दावेदार आहेत. मात्र या 3 संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सर्वाधिक प्रबळ दावा आहे.

दीप्तीची खेळी व्यर्थ

दरम्यान, यूपीकडून दीप्ती शर्माने शेवटपर्यंत झुंज दिली, पण तिला संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयश आले. दीप्तीने 60 चेंडूत 88 धावांची नाबाद खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. दीप्तीला पूनम खेमनारची साथ लाभली, तिने 36 चेंडूत नाबाद 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या दोघींनी 5व्या विकेटसाठी 109 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. मात्र, या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

WPL 2024, Gujarat Giants
WPL 2024: दिल्ली-मुंबई प्लेऑफमध्ये, तिसऱ्या स्थानासाठी आरसीबी अन् युपी वॉरियर्समध्ये काट्याची टक्कर, पाहा समीकरण

तत्पूर्वी, गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 8 गडी गमावून 152 धावा केल्या होत्या. गुजरातसाठी मुनीने 52 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावांची खेळी केली. मुनीशिवाय लॉरा वोलवॉर्टने (43) धावा केल्या.

या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघींशिवाय संघाचा अन्य कोणताही फलंदाज क्रिझवर टिकू शकला नाही. एक्लेस्टनच्या अंतिम षटकात मुनीने पाच चौकार मारले. शेवटच्या दोन षटकात 32 धावा जोडण्यात गुजरात संघाला यश आले. यूपीकडून सोफी एक्लेस्टनने सर्वाधिक 3 तर दीप्ती शर्माने 2 बळी घेतले.

WPL 2024, Gujarat Giants
WPL 2024: ऋचा घोषची तूफानी खेळी व्यर्थ, दिल्लीची प्लेऑफमध्ये धडक; रोमांचक सामन्यात स्मृतीची आरसीबी हारली

गुणतालिकेत गुजरातचे स्थान

गुणतालिकेत यूपीविरुद्धच्या या विजयाचा फायदा गुजरातला मिळाला नाही. गुजरातचा संघ अजूनही गुणतालिकेत तळाशी आहे. गुजरातचा 7 सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे तर यूपी 8 सामन्यात 3 विजय नोंदवून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली आणि मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com