WPL 2024: ऋचा घोषची तूफानी खेळी व्यर्थ, दिल्लीची प्लेऑफमध्ये धडक; रोमांचक सामन्यात स्मृतीची आरसीबी हारली

WPL 2024, Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore: महिला प्रीमियर लीगचा 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला.
Delhi Capitals | WPL 2024
Delhi Capitals | WPL 2024PTI
Published on: 
Updated on: 

WPL 2024, Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore: महिला प्रीमियर लीगचा 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या. ज्याच्या प्रतिसादात सामना खूपच रोमांचक झाला.

स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटपर्यंत झुंज दिली, पण 20 षटकांत केवळ 180 धावाच करता आल्या आणि अवघ्या एका धावसंख्येने सामना गमावला. बंगळुरुचे दिल्लीला पराभूत करण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले.

दिल्लीची शानदार खेळी

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय दिल्लीच्या फलंदाजांनी योग्य ठरवला.

पॉवर प्लेमध्ये शफाली वर्मासह कर्णधार मेग लॅनिंगने 53 धावांची दमदार सुरुवात केली, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर शफाली वर्मा 18 चेंडूत 23 धावा करुन आशा शोभनाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर 60 धावांच्या आत कर्णधार मेग लॅनिंगही श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. मेग लॅनिंगने 26 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ॲलिस कॅप्सीने दिल्लीच्या डावाची धुरा सांभाळली आणि तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 36 चेंडूत 58 धावांची शानदार खेळी खेळली. ज्यात तिने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

जेमिमाह बाद झाल्यानंतर ॲलिस कॅप्सीही संघाच्या खात्यात 19 धावा जमा करुन 32 चेंडूत 48 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. मारिझने कॅपने 6 चेंडूत 12 धावा करत दिल्लीची धावसंख्या 181 पर्यंत पोहोचवली. बंगळुरुकडून गोलंदाजीत श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर आशा शोभना हिला एक विकेट मिळाली.

Delhi Capitals | WPL 2024
WPL 2024: मुंबई इंडियन्सने लगावला रेकॉर्डचा 'सिक्सर', हरमनप्रीत कौरने रचला इतिहास; स्मृती मानधनाला सोडले मागे

ऋचा घोषची खेळी व्यर्थ

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 20 षटकांत 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली आणि कर्णधार स्मृती मानधना 7 चेंडूत 5 धावा केल्यानंतर एलिस कॅप्सीच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाली.

यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलिस पेरीने बंगळुरुचा डाव सांभाळत दिल्लीच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. अॅलिस पेरी आणि सोफी मोलिन्यू यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली, परंतु पेरी धावबाद झाल्यानंतर आरसीबीचा गडगडला. पेरीने धावबाद होण्यापूर्वी 32 चेंडूत 49 धावांची अतिशय खास खेळी खेळली होती. पेरीच्या या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता.

सोफी मोलिन्यूने पेरीला चांगली साथ दिली, मात्र पेरी बाद झाल्यानंतर तीही 30 चेंडूत 33 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. ऋचा घोषने आरसीबीसाठी 51 धावांची शानदार खेळी खेळली पण ती संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरली.

शेवटच्या चेंडूवर संघाला दोन धावांची गरज होती, ऋचाने जेस जोनासनच्या चेंडूवर जोरदार शॉट खेळला आणि धाव घेतली पण ती पूर्ण करु शकली नाही. शफाली वर्माने तिला धावबाद केले. एकवेळ मजबूत स्थितीत दिसणाऱ्या आरसीबीला परत दोन मोठे धक्के बसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court Delhi restrictions
Supreme Court Delhi barricades
Abhijeet Dipke Detained Delhi Airport
Asian Games Final IND vs PAK
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com