Harmanpreet Kaur  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024, MI vs GG: खूब लढी हरमन... मुंबई इंडियन्सचे टॉप 3 मधील स्थान पक्के; गुजरातचा 7 विकेट्सने पराभव

WPL 2024 MI vs GG Match: मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील 16 वा सामना खेळला गेला.

Manish Jadhav

WPL 2024 MI vs GG Match: महिला प्रीमियर लीगचा 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने हंगामातील पाचवा विजय नोंदवून अंतिम फेरीचे किंवा एलिमिनेटरचे तिकीट निश्चित केले आहे. दरम्यान, पहिले सलग चार सामने गमावलेल्या गुजरात जायंट्सने शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले होते, मात्र आता मुंबईकडून पराभूत झाल्याने गुजरात जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर मुंबई इंडियन्स या विजयासह पॉंइट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 95 धावांची विस्फोटक खेळी खेळून संघाला विजयापर्यंत नेले.

गुजरातने 191 धावांचे लक्ष्य दिले होते

दरम्यान, गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने 20 षटकांत सात गडी गमावून 190 धावा केल्या होत्या. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातची विशेष सुरुवात झाली नव्हती.

संघाला पहिला धक्का लॉराच्या रुपाने बसला, जिला केवळ 13 धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलताने विस्फोटक खेळी खेळली. तिने धडाकेबाज फलंदाजाने कर्णधार बेथ मुनीसोबत शतकी भागीदारी केली.

या दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 62 चेंडूत 121 धावांची भागीदारी झाली होती. मुनीने आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या, तर दयालनने नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या.

दुसरीकडे, फोबीने तीन, ॲश्ले गार्डनरने एक धाव, कॅथरीन ब्राइसने सात धावा तर स्नेह राणाने एक धाव काढली. भारती फुलमाली 21 धावांवर नाबाद राहिली तर तनुजा एकही धाव न काढता नाबाद राहिली. मुंबईकडून सायका इशाकने 2 तर हेली, शबनीम, पूजा वस्त्राकार आणि सजीवन सजना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दुसरीकडे, 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. यास्तिका आणि हेली मॅथ्यूज यांच्यात पहिल्या विकेटसाठी 39 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. मात्र, संघाला पहिला धक्का मॅथ्यूजच्या रुपाने बसला. 21 चेंडूत 18 धावा करुन ती बाद झाली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नेट सिव्हर ब्रंटला दोन धावा करता आल्या. त्याचवेळी, संघाला तिसरा धक्का यास्तिका भाटियाच्या रुपाने बसला. जिने 36 चेंडूत 49 धावा केल्या. तिने आपल्या दमदार खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला. गुजरातकडून ॲश्ले गार्डनर, तनुजा कंवर आणि शबनम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हरमनप्रीत कौरची झंझावाती खेळी

हरमनप्रीत कौरने शानदार फलंदाजी केली. 48 चेंडूत 95 धावा करुन ती नाबाद राहिली. तिने आपल्या खेळीत 10 चौकार आणि पाच षटकार मारले. या सामन्यात एकवेळ गुजरातचा संघ ड्रायव्हिंग सीटवर होता. शेवटच्या चार षटकात मुंबईला 65 धावांची गरज होती. मात्र येथून आलेली दोन षटके मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी टर्निंग पॉइंट ठरली. या दोन षटकांमुळे गुजरातला सामना गमवावा लागला.

स्नेह राणा आणि शबनम शकील खलनायक ठरल्या

शबनम शकीलने गुजरातसाठी डावातील 17 वे षटक टाकले. या षटकात तिने 18 धावा दिल्या. त्यानंतर 18व्या षटकात हरमनप्रीत कौरने स्नेह राणाचा चांगलाच समाचार घेतला. राणाच्या षटकात हरमनने तीन चौकार आणि दोन षटकारांसह 24 धावा काढल्या. त्यामुळे शेवटच्या 2 षटकात संघाला 23 धावांची गरज होती. त्यानंतर 19व्या षटकात तनुजा कंवरने 10 धावा दिल्या आणि 20व्या षटकात ॲश्ले गार्डनरला 13 धावा काढल्या. अशाप्रकारे 19.5 षटकात मुंबईने 7 गडी राखून सामना जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT