Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: मुंबई इंडियन्सने लगावला रेकॉर्डचा 'सिक्सर', हरमनप्रीत कौरने रचला इतिहास; स्मृती मानधनाला सोडले मागे

WPL 2024, Gujarat Giants vs Mumbai Indians Match: महिला प्रीमियर लीगचा 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

WPL 2024, Gujarat Giants vs Mumbai Indians Match: महिला प्रीमियर लीगचा 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने हंगामातील पाचवा विजय नोंदवून अंतिम फेरीचे किंवा एलिमिनेटरचे तिकीट निश्चित केले.

दरम्यान, पहिले सलग चार सामने गमावलेल्या गुजरात जायंट्सने शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले होते, मात्र आता मुंबईकडून पराभूत झाल्याने गुजरात जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

तर मुंबई इंडियन्स या विजयासह पॉंइट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 95 धावांची विस्फोटक खेळी खेळून संघाला विजयापर्यंत नेले.

दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने 20 षटकांत 7 गडी बाद 190 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने 19.5 षटकांत 3 बाद 191 धावा करत सामना जिंकला. त्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने 48 चेंडूत 95 धावांची शानदार खेळी खेळली. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली.

विशेष म्हणजे, या सामन्यात अनेक रेकॉर्डची नोंद झाली. हरमनप्रीतने पहिल्या 16 चेंडूंवर 15 धावा केल्या होत्या. यानंतर तिने विस्फोटक फलंदाजी केली. तिने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 48 चेंडूत 95 धावांची तिने शानदार खेळी खेळली.

विशेष म्हणजे, ती नाबाद राहिली. हरमनप्रीतने या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. तिने अमेलिया करसोबत चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

दुसरीकडे, WPL इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सने केला. यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ने गेल्या मोसमात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर जायंट्सविरुद्ध 189 धावांचा पाठलाग करुन हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

हरमनप्रीतने डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईद्वारा हायस्ट इंडिव्हिजुअल खेळाडूचा रेकॉर्ड केला. तिने हेली मॅथ्यूजचा रेकॉर्ड मोडला. मॅथ्यूजने गेल्या मोसमात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध 38 चेंडूत 77 धावा केल्या होत्या.

सोफी डिव्हाइन (Sophie Devine) च्या 99 धावा (2023 मध्ये जायंट्स विरुद्ध) आणि Alyssa Healy च्या 96* धावा (2023 मध्ये RCB विरुद्ध) नंतर हरमनप्रीतच्या 95 धावा ही WPL मधील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

तसेच, हरमनप्रीतने डब्ल्यूपीएल इतिहासात भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्डही केला. तिने स्मृती मानधनाला मागे सोडले. मानधानाने 4 मार्च 2024 रोजी यूपी वॉरियर्सविरुद्ध 50 चेंडूत 80 धावा केल्या होत्या.

मुंबई इंडियन्सने WPL सामन्याच्या शेवटच्या 6 षटकांमध्ये सर्वाधिक 91 धावा करण्याचा रेकॉर्ड केला. मुंबईच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेले.

डब्ल्यूपीएलमध्ये 500 धावांचा टप्पा गाठणारी हरमनप्रीत कौर पहिली भारतीय ठरली. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने पहिल्या सत्रात ही कामगिरी केल्यानंतर, ती अशी कामगिरी करणारी एकूण दुसरी खेळाडू ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT