UP Warriorz Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: युपी वॉरियर्सचं प्लेऑफचं तिकीट पक्क! अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव

GG vs UPW: युपीने गुजरातला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश पक्का केला आहे. युपीच्या विजयाच्या ग्रेस हॅरिस आणि ताहलिया मॅकग्रा शिल्पकार ठरल्या.

Pranali Kodre

Gujarat Giants vs UP Warriorz: वूमन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 17 वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह युपी वॉरियर्सने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. ग्रेस हॅरिस आणि ताहलिया मॅकग्रा यांनी युपीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचणारा युपी वॉरियर्स तिसरा संघ ठरला. यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. पण, यामुळे आता गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आव्हान अधिकृतरित्या संपले आहे. आता मुंबई, दिल्ली आणि युपी या तिन्ही संघात अव्वल स्थान मिळून थेट अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी शर्यत असेल.

या सामन्यात गुजरातने युपीसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग युपीने 19.5 षटकात 7 बाद 181 धावा करत पूर्ण केला. या सामन्यात अखेरच्या षटकात युपीला 7 धावांची गरज होती. हे षटक गुजरातकडून कर्णधार स्नेह राणाने टाकले.

पण तिने टाकलेल्या पहिल्या दोन चेंडूवर सोफी एक्लेस्टोनने तीन धावा काढल्या. मात्र तिसऱ्या चेंडूवर सिमरन शेखने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेताना सिमरन धावबाद झाली. त्यामुळे दोन चेंडूत 2 धावा असे समीकरण असताना एक्लेस्टोनने चौकार ठोकला आणि विजय निश्चित केला.

तथापि, युपीची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी देविका वैद्य, एलिसा हेली आणि किरण नवगिरे यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. त्यामुळे युपीची अवस्था 3 बाद 39 धावा अशी झाली होती. मात्र, त्यानंतर ताहलिया आणि हॅरिस यांनी डाव फक्त सांभाळलाच नाही, तर युपीच्या विजयाचा पाया रचला. त्यांनी आक्रमक खेळ करताना चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली.

अखेर ही भागीदारी ऍश्ले गार्डनरने ताहलियाला बाद करत मोडली. ताहलियाने 38 चेंडूत 11 चौकारांसह 57 धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर दीप्ती शर्माही 6 धावांवर बाद झाली. पण हॅरिसला सोफी एक्लेस्टोनने साथ दिली. या दोघींमध्ये 42 धावांची भागीदारी झाली. पण युपीला 8 चेंडूत 7 धावांची गरज असताना हॅरिसला किम गार्थने बाद केले. हॅरिसने 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.

ती बाद झाल्यानंतर एक्लेस्टोनने गुजरातला विजयापर्यंत पोहचवले. एक्लेस्टोन 19 धावांवर नाबाद राहिली. गुजरातकडून किम गार्थने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोनिका पटेस, ऍश्ले गार्डनर, तनुजा कन्वर आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी गुजरातने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. गुजरातकडून दयालन हेमलथा आणि ऍश्ले गार्डनर यांनी अर्धशतके केली. या दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारीही झाली. हेमलताने 33 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची खेळी केली. तसेच गार्डनरने 39 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 60 धावांची खेळी केली.

यांच्याशिवाय लॉरा वॉल्वार्ड (17) आणि सोफी डन्कली (23) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे गुजरातने 20 षटकात 6 बाद 178 धावा केल्या. युपीकडून पार्शवी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अंजली सारवानी आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

SCROLL FOR NEXT