IND vs NZ T20 World Cup 2026 Final Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2026 Final: फायनलचा फिव्हर! 6 हजारांची रूम थेट 80 हजारांना; अहमदाबादमध्ये हॉटेल्सचे अन् विमान तिकिटांचे दर गगनाला

IND vs NZ T20 World Cup 2026 Final: उद्या ८ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Sameer Amunekar

अहमदाबाद: उद्या ८ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, या ऐतिहासिक सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहचू इच्छिणाऱ्या चाहत्यांना महागाईचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. शहरात हॉटेल रूम्स आणि विमान प्रवासाचे दर पाहून चाहत्यांचे धाबे दणाणले आहेत.

हॉटेल दरात ३ ते ४ पटीने वाढ

अहमदाबादमध्ये हॉटेलच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सामान्य दिवसांत ५ ते ६ हजार रुपयांना मिळणाऱ्या रूम्सचे दर आता थेट १५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. शहरात हॉटेलच्या ७० ते ८० टक्के खोल्या आधीच बुक झाल्या आहेत. इतक्या प्रचंड किमती असूनही राहण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे, ज्यामुळे हॉस्पिटॅलिटी सेक्टरला या काळात ५० ते ६० टक्क्यांहून अधिक कमाईची अपेक्षा आहे.

विमान प्रवासाचे दरही आकाशाला भिडले

फक्त हॉटेल्सच नव्हे, तर विमान कंपन्यांनीही तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांतून अहमदाबादला येणाऱ्या विमानांचे तिकीट सध्या १५ हजार ते ३० हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे, जे सामान्यतः ५ ते ७ हजार रुपयांच्या आसपास असते. परदेशातून येणाऱ्या चाहत्यांसाठी तर परिस्थिती अधिकच बिकट असून, लंडन ते अहमदाबादचे विमान तिकीट १.२ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

स्पेशल ट्रेनची घोषणा

विमान आणि हॉटेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य चाहत्यांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे टर्मिनसवरून अहमदाबादसाठी विशेष एसी ट्रेनची घोषणा केली आहे. यामुळे चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

४० हजारांहून अधिक चाहते

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १.२ लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये शहराबाहेरून सुमारे ३० ते ४० हजार चाहते अहमदाबादला भेट देणार आहेत. या महासंग्रामाचा भाग बनण्यासाठी चाहते कोणतीही किंमत मोजायला तयार असले, तरी वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT