Jos Buttler Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू बनणार रनमशीन, दिग्गजाचा खेळाडू मोठा दावा

Leading Run Scorer in World Cup: आगामी एकदिवसीय विश्वचषक (World Cup-2023) भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

Leading Run Scorer in World Cup: आगामी एकदिवसीय विश्वचषक (World Cup-2023) भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा विश्वविजेता व्हावे, अशी भारताच्या करोडो चाहत्यांची इच्छा आहे. विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, एका दिग्गजाने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा अंदाज वर्तवला आहे.

5 ऑक्टोबर पासून सुरु

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे, जो भारतात खेळला जाणार आहे. दरम्यान, या अनुभवी खेळाडूने आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यासंबंधी मोठा दावा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक जॅक कॅलिस याला विश्वास आहे की, धावा करण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडू नव्हे तर आणखी काही खेळाडू आघाडीवर असतील.

इंग्लंडचा खेळाडू बनणार रनमशीन

कॅलिसने यासाठी इंग्लंडच्या एका स्टार खेळाडूची निवड केली आहे. जॅक कॅलिसने विराट कोहली किंवा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे नाव घेतले नाही. त्यासाठी त्याने इंग्लंडचा अनुभवी जोस बटलरची निवड केली आहे.

तो म्हणाला की, बटलर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. आयसीसीच्या एका व्हिडिओमध्ये जॅक कॅलिस पुढे म्हणाला की, 'मला वाटते की जोस बटलर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. मला वाटतं की तो असा दिग्गज सिद्ध होईल जो या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल.

जोस बटलर 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता

जोस बटलर 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव केला होता.

यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने आतापर्यंत 165 एकदिवसीय सामने खेळले असून, 11 शतके आणि 24 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 4647 धावा केल्या आहेत. वनडेत त्याची सरासरी 41.49 च्या आसपास आहे. या फॉरमॅटमधील त्याला एकूण स्ट्राइक रेट 117.97 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT