Wankhede Stadium Dainik Gomantak
क्रीडा

वानखेडे स्टेडियमवर बांधले जाणार ‘विजय स्मारक’, World Cup 2011 च्या आठवणीत...

World Cup 2011: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांनी सोमवारी वानखेडे स्टेडियमवर मिनी 'विजय स्मारक' बांधण्याची घोषणा केली.

Manish Jadhav

World Cup 2011: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांनी सोमवारी वानखेडे स्टेडियमवर मिनी 'विजय स्मारक' बांधण्याची घोषणा केली. एमसीएच्या सर्वोच्च परिषदेने हा निर्णय घेतला आहे. ज्या स्टेडियममध्ये महेंद्रसिंग धोनीने ऐतिहासिक विजयी षटकार मारला होता, तिथे हे स्मारक बांधले जाईल.

8 एप्रिल रोजी त्याचे उद्घाटन होऊ शकते

एमसीए उद्या (मंगळवारी) एमएस धोनीशी संपर्क साधेल आणि स्मारकाच्या उद्घाटनासाठी भेटीची वेळ मागेल, असेही अध्यक्ष अमोल यांनी सांगितले. 8 एप्रिल रोजी CSK आणि मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सामन्यासाठी एमएस धोनी मुंबईत असताना एमसीएने त्याचे उद्घाटन करणे अपेक्षित आहे.

दुसरीकडे, तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, कारण ती पूर्णपणे एमएस धोनीच्या संमती आणि उपलब्धतेवर अवलंबून असेल. वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप (World Cup) विजय स्मारकाचे उद्घाटन करताना एमसीए एमएस धोनीचा सत्कार करेल.

91 धावांची नाबाद खेळी खेळली

2 एप्रिल 2011 रोजी भारताने 28 वर्षांनंतर दुसरा विश्वचषक जिंकला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला होता. महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात संस्मरणीय खेळी खेळत षटकार ठोकून ऐतिहासिक विजय मिळवला होता. एमएस धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. विशेष म्हणजे, त्याने 91 धावांची नाबाद खेळी खेळली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT