World Cup 2023 साठी श्रीलंकेचं डायरेक्ट एन्ट्रीचं स्वप्न भंगलं! आता अशी मिळू शकते संधी

न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी वनडे मालिका पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेने यावर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश करण्याची संधी गमावली आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak

New Zealand vs Sri Lanka: शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अखेरच्या सामन्यात 6 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत थेट प्रवेशाचे स्वप्न भंगले आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे.

तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने 4 विकेट्स गमावत 32.5 षटकात 159 धावा करत सहज पूर्ण केला. या विजयासह न्यूझीलंडने २-० अशा फरकाने ही वनडे मालिकाही जिकंली.

दरम्यान, या मालिका पराभवामुळे आता श्रीलंकेला जूनमध्ये झिम्बाब्वेला जाऊन वर्ल्डकपची पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. या स्पर्धेतून श्रीलंकेला भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करावी लागणार आहे.

Sri Lanka
IPL 2023, GT vs CSK: दोन्ही संघात ऑलराऊंडर्सचा भरणा! पहिल्या सामन्यात कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी

वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या थेट पात्रतेसाठी गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण यजमान असल्याने वर्ल्डकपसाठी यापूर्वीच थेट पात्र ठरला आहे.

पण या गुणतालिकेत श्रीलंकेला सध्या आठव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजला मागे टाकता आलेले नाही. वेस्ट इंडिज या गुणतालिकेत 88 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. तसेच श्रीलंकेच्या मात्र क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेतील सर्व मालिका संपल्याने ते 81 गुणांसह 9 व्या क्रमांकावर राहिले.

क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेबद्दल तपशील

वर्ल्डकपसाठी थेट पात्रतेसाठी क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेअंतर्गत क्रमवारीतील अव्वल 13 संघ गेल्या तीन वर्षांपासून वनडे मालिका खेळत आहेत. या स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या आठ क्रमांकावर राहणारे संघ वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

तसेच उर्वरित 5 संघांना आणि आयसीसीच्या सहसदस्य संघांना वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. या पात्रता फेरीतून 2 संघ 2023 वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. त्यानंतर एकूण 10 संघात वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Sri Lanka
IPL 2023: आजपासून सुरू होणार 10 संघात थरार! कुठे, केव्हा अन् कशा पाहाणार मॅच? घ्या जाणून

सध्या क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर १७५ गुणांसह न्यूझीलंड आहे. त्यापाठोपाठ 155 गुणांसह इंग्लंड आहे. त्यानंतर भारत (139), बांगलादेश (130), पाकिस्तान(130), ऑस्ट्रेलिया (120), अफगाणिस्तान (115) हे संघ असून हे सर्व सात संघ वर्ल्डकप 2023 साठी थेट पात्र ठरले आहेत.

आता गुणतालिकेत आठवा क्रमांक मिळून थेट पात्र ठरण्यासाठी सध्या वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या संघांमध्ये चूरस आहे. दक्षिण आफ्रिकेला अद्याप नेदरलँड्सविरुद्ध दोन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

तसेच आयर्लंडला बांगलादेशविरुद्ध मे महिन्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकांनंतर आठवा क्रमांक निश्चित होणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिका 78 गुणांसह 10 व्या आणि आयर्लंड 68 गुणांसह 11 व्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com