Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तानने तब्बल 13 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कपमध्ये सामना

आयसीसी (ICC) महिला विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानने आपल्या विजयाची नोंद केली आहे. वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी पराभव करत पराक्रम केला आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसी (ICC) महिला विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी पराभव करत पाकिस्तानने हा पराक्रम केला आहे. महिला विश्वचषकाच्या इतिहासावर नजर टाकल्यास 13 वर्षांनंतर पाकिस्तानचा (Pakistan) हा पहिला विजय आहे. विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा शेवटचा विजय 2009 साली झाला होता. यादरम्यान पाकिस्तानला सलग 18 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धची (West Indies) पराभवाची मालिका खंडित करण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर पाकिस्तानचा हा पहिला वनडे विजय आहे. (Womens World Cup 2022 Pakistan defeated West Indies by 8 wickets)

दरम्यान, हॅमिल्टनमध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगला होता. मात्र पावसामुळे सामन्यात अडथळा आला. पावसामुळे सामन्याची षटके 20-20 षटकांची करण्यात आली. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

पाकिस्तानने प्रथम 7 चेंडूत फटकेबाजी केली

या सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी खूपच खराब झाली. संघाचा एकही फलंदाज मैदानावर तग धरु शकला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये 2 शतके झळकावणाऱ्या डायंड्रा डॉटिननेही आपेक्षाभंग केला. परंतु तीही 27 धावा करुन बाद झाली. संपूर्ण कॅरेबियन संघ 20 षटके खेळू शकला. परंतु स्कोअर बोर्ड 7 गडी गमावून 89 धावाच वेस्ट इंडिजचा संघ करु शकला. या सामन्यात 4 षटकात 10 धावा देत 4 फलंदाजांना बाद करणाऱ्या पाकिस्तानसाठी निदा दार ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. महिला विश्वचषकात पाकिस्तानी गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

आता पाकिस्तानसमोर 90 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 7 चेंडूत 2 गडी गमावून पूर्ण केले. पाकिस्तानसाठी कर्णधार बिस्माह आणि ओमाइमा सोहेल शेवटपर्यंत नाबाद राहिले. 20 धावा केल्यानंतर बिस्माह नाबाद राहिली. तर ओमैमाने नाबाद 22 धावा केल्या.

गुणतालिकेत संघांच्या स्थानात कोणताही फरक नाही

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही वेस्ट इंडिजच्या गुणतालिकेत काही फरक पडलेला नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 3 सामने जिंकले तर 3 हरले आहेत. आणि, अशा प्रकारे त्यांनी तिसरे स्थान कायम राखले आहे. पाकिस्तानचा 5 सामन्यांमधला हा पहिला विजय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT