PAK vs AUS: जगातील नंबर 1 फलंदाज पाकिस्तानमध्ये ठरला 'फ्लॉप' !

लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीतील (Pakistan v Australia, 3rd Test) पहिल्या डावात मार्नस शून्यावर आऊट झाला.
Marnus Labuschagne
Marnus LabuschagneDainik Gomantak

जगातील नंबर 1 फलंदाज जेव्हा-जेव्हा क्रीझवर येतो तेव्हा त्याच्याकडून शानदार कामगिरीची आपेक्षा असते. तो पुढच्या टीममधील गोलंदाजांचा आपल्या फलंदाजीच्या जोरावर चांगलाच समाचार घेईल अशीही आपेक्षा केली जाते. त्याचबरोबर आपल्या संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलेल, असं सामन्यत: हा क्रिकेट चाहत्यांना वाटत असते. परंतु मार्नस लॅबुशेनची (Marnus Labuschagne) गंगा उलट्या दिशेने वाहत आहे. नंबर 1 कसोटी फलंदाज मार्नस लॅबुशेन पाकिस्तानमध्ये फ्लॉप ठरताना दिसला आहे. लाहोरमध्ये (Lahore) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीतील (Pakistan vs Australia, 3rd Test) पहिल्या डावात मार्नस शून्यावर आऊट झाला. दुसऱ्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) मार्नस लॅबुशेनला ड्राईव्ह टाकला तेव्हा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानकडून तो झेलबाद झाला. (Marnus Labuschagne is out for zero in the third Test against Pakistan)

दरम्यान, लाहोरमध्येच नव्हे तर कराची कसोटीच्या पहिल्या डावातही मार्नस लॅबुशेन शून्यावर बाद झाला होता. त्या सामन्यात साजिद खानच्या थ्रोवर लबुशेन धावबाद झाला. मात्र, पहिल्या कसोटीत मार्नसने 19 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. कसोटी क्रिकेटमध्ये आल्यापासून लॅबुशेनने चमकदार कामगिरी केली आहे. परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म कमालीचा घसरला आहे.

Marnus Labuschagne
PAK vs AUS: काय घडलं! PM इम्रान खान यांच्यामुळे ODI मालिकेचे बदलले ठिकाण

मार्नस लॅबुशेनचा खराब फॉर्म

मार्नस लॅबुशेनने मागील 6 कसोटी सामन्यांमध्ये 26.77 च्या सरासरीने 241 धावा केल्या आहेत. यादरम्यान लॅबुशेनने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. लबुशेनला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने शाहीन आफ्रिदीविरुद्ध 174 चेंडूत 81 धावा केल्या आहेत, परंतु यादरम्यान त्याने 5 वेळा विकेट गमावली आहे. आफ्रिदीविरुद्ध लॅबुशेनची सरासरी फक्त 16.2 आहे.

Marnus Labuschagne
PAK Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या ODI अन् T20 संघाची घोषणा

आशियामध्ये लबुशेन जादू चालली नाही

मार्नस लॅबुशेनने 26 कसोटी सामन्यांमध्ये 54 च्या सरासरीने 2354 धावा केल्या आहेत. परंतु त्याने फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्येच आक्रमक फलंदाजी केली आहे. आशियाई भूमीवर लबुशेनची बॅट आतापर्यंत शांतच राहीली आहे. एकीकडे त्याची इंग्लंडमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) त्याची सरासरी 63 पेक्षा जास्त आहे, तर आशियामध्ये त्याची सरासरी प्रति डाव केवळ 26.87 धावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com