पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. मात्र, मार्चअखेर होणार्या या मालिकेवर पाकिस्तानच्या राजकीय गोंधळाचा परिणाम झाला आहे. पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधातील वातावरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशा स्थितीत पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील (Australia) एकदिवसीय मालिकेच्या सुरक्षेशी तडजोड (The venue of the ODI series between Pakistan and Australia has changed) टाळण्यासाठी, इम्रान खान यांनी सुरक्षेशी तडजोड केली आहे. त्यामुळे मालिकेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी ही मालिका आता रावळपिंडीऐवजी (Rawalpindi) लाहोरमध्ये (lahore) आयोजित केली जाणार आहे. (The one day series between Pakistan and Australia will be played in Lahore instead of Rawalpindi)
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असून त्यावर पुढील आठवड्यात मतदान होणार आहे. इम्रान खान यांचा सत्ताधारी पक्ष पीटीआय 27 मार्च रोजी इस्लामाबादमध्ये एक मोठी रॅली काढणार आहे, ज्यामध्ये लाखो इम्रान समर्थक पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, त्याआधी 23 मार्च रोजी विरोधी पक्षांचा मोर्चा रावळपिंडी ते इस्लामाबाद असा मोर्चा काढत आहेत.
इस्लामाबाद-रावळपिंडी जवळ असल्यामुळे निर्णय
अशा परिस्थितीत देशात राजकीय अस्थिरतेची परिस्थिती असल्याने ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे वनडे मालिकेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी शुक्रवारी 18 मार्च रोजी याची घोषणा केली. जरी ही रॅली इस्लामाबादमध्ये होणार असली तरी, रावळपिंडी हे इस्लामाबादला लागून असलेले शहर असल्याने सुरक्षेला धोका आहे. इस्लामाबादमध्ये 27 मार्चला इम्रान समर्थकांची रॅली ज्या ठिकाणी होणार आहे, ते ठिकाण रावळपिंडीतील दोन्ही संघांच्या हॉटेलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे.
29 मार्चपासून एकदिवसीय मालिका
24 वर्षांनंतर पाकिस्तानात आलेला ऑस्ट्रेलियन संघ सध्या दोन कसोटी सामने खेळला आहे. पहिला कसोटी सामना रावळपिंडीतच खेळला गेला, त्यानंतर दोन्ही संघ कराचीत आमने सामने आले. त्यावेळी दोन्ही सामने अनिर्णित राहिले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 21 मार्चपासून लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, एकदिवसीय मालिकेचे सामने 29 मार्च, 31 मार्च आणि 2 एप्रिल रोजी होणार आहेत, तर एकमेव टी-20 सामना 5 एप्रिल रोजी लाहोरमध्ये होणार आहे. सध्या एकदिवसीय मालिकेच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.