Goa U23 Women's Team 
क्रीडा

Goa U23 Women's Team: 23 वर्षांखालील महिला टी20 स्पर्धेसाठी गोवा संघाची घोषणा; पूर्वजाकडे नेतृत्व

U23 Women's T20 Trophy: 23 वर्षांखालील महिला टी20 स्पर्धेत गोव्याच्या लढती 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

किशोर पेटकर

U23 Women's T20 Cricket Trophy, Goa Team:

महिलांच्या 23 वर्षांखालील वयोगटातील टी-20 क्रिकेट स्पर्धेत पूर्वजा वेर्लेकर गोव्याच्या संघाचे नेतृत्व करेल. पूर्वा भाईडकर हिची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. ‘ई’ गटातील स्पर्धा 10 डिसेंबरपासून नागपूर येथे खेळली जाईल.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी 16 सदस्यीय संघ जाहीर केला. रेल्वे संघाने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे ‘ई’ गटात गोव्यासह सहा संघ आहेत.

10 ते 19 डिसेंबर या कालावधीत गोव्याचा संघ अनुक्रमे सौराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, मेघालय व बंगाल या संघांविरुद्ध खेळेल.

संघातील खेळाडू

पूर्वजा वेर्लेकर (कर्णधार), पूर्वा भाईडकर (उपकर्णधार), तनया नाईक, दिव्या नाईक, मेताली गवंडर, सेजल सातार्डेकर, कंविक्षा रेकडो, हर्षदा कदम, हर्षिता यादव, स्वराली कासार, कृपा पटेल, सेजल नाईक, इब्तिसाम शेख, ऊर्वशी गोवेकर, सिद्धी सवासे, सावली कोळंबकर.

गोव्याच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • तारीख 10 डिसेंबर - विरुद्ध सौराष्ट्र

  • तारीख 13 डिसेंबर - विरुद्ध पंजाब

  • तारीख 15 डिसेंबर - विरुद्ध मध्य प्रदेश

  • तारीख 17 डिसेंबर - विरुद्ध मेघालय

  • तारीख 19 डिसेंबर - विरुद्ध बंगाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT