WTT Star Contender साठी गोव्याला पुन्हा पसंती, जगभरातील प्रमुख टेबल टेनिसपटूंचा सहभाग

WTT Star Contender: ‘डब्ल्यूटीटी स्टार कंटेन्डर स्पर्धेत जगभरातील प्रमुख टेबल टेनिसपटूंचा सहभाग असणार आहे.
Sharath Kamal Table Tennis
Sharath Kamal Table Tennis
Published on
Updated on

WTT Star Contender Table Tennis Tournament will be held in Goa:

जगभरातील प्रमुख टेबल टेनिसपटूंचा सहभाग असलेली वर्ल्ड टेबल टेनिस (WTT) स्टार कंटेन्डर स्पर्धा येत्या 23 ते 28 जानेवारी या कालावधीत होईल. भारतात सलग दुसऱ्या वर्षी होणारी स्पर्धा खेळविण्यासाठी यावेळीही गोव्यास पसंती मिळाली आहे.

डब्ल्यूटीटी स्टार कंटेन्डर स्पर्धा यावर्षी 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाली होती.

आता सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान गोव्याला लाभला आहे. स्तुपा स्पोर्टस ऍनॅलिटिक्स व अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) यांच्यातर्फे आणि भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या (TTFI) मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेतली जाईल.

Sharath Kamal Table Tennis
I-League 2023-24: चर्चिल ब्रदर्सला शिलाँगच्या संघाकडूनही धक्का! चौथ्या पराभवामुळे आणखी घसरण

गोव्यातील मागील स्टार कंटेन्डर स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित फॅन झेनडोंग, टोमोकाझू हारिमोटो, जागतिक क्रमवारीतील चतुर्थ मानांकित वँग यिदी, पाचव्या क्रमांकावरील हिना हयाटा आदी खेळाडू उतरले होते. शिवाय भारतीय टेबल टेनिसपटूंनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळाली होती.

गतवर्षी गोव्यातील स्पर्धेत चिनी खेळाडूंनी दबदबा राखताना पुरुष व महिला एकेरीत विजेतेपद मिळविले होते. पुरुषांत लिअँग जिंगकुन, तर महिलांत वँग यिदी विजेती ठरली होती.

‘‘गोव्यात झालेली पहिली डब्ल्यूटीटी स्टार कंटेन्डर स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. देशात टेबल टेनिस अजूनही प्रारंभिक टप्प्यावर आहे आणि अशाप्रकारच्या स्पर्धांमुळे खेळातील व्यावसायिक क्षमता प्रदर्शित होते, त्याचबरोबर एकंदरीत वाढीला प्रोत्साहन देते,’’ असे स्तुपा स्पोर्टस ऍनॅलिटिक्सच्या सीईओ व सहसंस्थापक मेघा गंभीर यांनी सांगितले.

Sharath Kamal Table Tennis
National basketball championship: गोव्याचा पुरुष बास्केटबॉल संघ बाद फेरीत दाखल; गटात मिळवले अव्वल स्थान

‘सिक्स स्टार’ मालिकेतील स्पर्धा

भारतातील डब्ल्यूटीटी स्टार कंटेन्डर स्पर्धा ‘सिक्स स्टार कंटेन्डर’ मालिकेचा भाग आहे. स्पर्धेत फक्त अव्वल 30 खेळाडू पात्र ठरतात ज्यामध्ये पहिल्या 20 मानांकनातील सहा खेळाडू असणे बंधनकारक असते. स्पर्धेत 250,000 डॉलर्स रकमेची बक्षिसे दिली जाईल.

या स्पर्धेतील मानांकन गुणांनुसार खेळाडूंना डब्ल्यूटीटी कप फायनल्स व डब्ल्यूटीटी चॅपियन्स सीरिज स्पर्धेसाठी पात्रता मिळवता येईल.

भारतीय खेळाडूंसाठी संधी: कमलेश

‘‘जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध खेळणे किंवा त्यांना खेळताना जवळून पाहणे युवा पिढीला नेहमीच प्रेरणा देते. ही स्पर्धा आमच्या भारतीय खेळाडूंसाठी छान संधी आहे. स्पर्धेची दुसरी आवृत्तीही मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी स्तुपा स्पोर्टस ऍनॅलिटिक्स व अल्टिमेट टेबल टेनिसला टीटीएफआयला पूर्ण पाठिंबा आहे,’’ असे भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव कमलेश मेहता यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com