WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: अवघ्या 30 जागांसाठी 165 खेळाडू लिलावाच्या मैदानात! कोणत्या संघात किती जागा अन् पैसे शिल्लक?

Pranali Kodre

Women’s Premier League Player Auction 2024:

भारतात 2023 साली पहिल्यांदाच 5 संघांमध्ये वूमन्स प्रीमियर लीग (WPL) खेळवण्यात आली होती. या पहिल्याच हंगामाला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसादही मिळाला. आता 2024 मध्ये या लीगचा दुसरा हंगाम खेळवण्यात येणार असून या हंगामााठी खेळाडूंच्या लिलावाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

डब्ल्युपीएलचा लिलाव 9 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. या लिलावात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाचही संघ आपला संघ पूर्ण करण्यासाठी बोली लावताना दिसतील.

या लिलावासाठी नोंदणी केलेल्या एकूण खेळाडूंमधून 165 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत 165 खेळाडूंचे नाव लिलावात पुकारले जाईल.

दरम्यान, लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या 165 खेळाडूंपैकी 104 खेळाडू भारतीय आहेत आणि 61 खेळाडू परदेशी आहेत. या 61 खेळाडूंपैकी 15 खेळाडू आयसीसीच्या सहसदस्य संघांमधील आहेत.

तसेच 165 खेळाडूंपैकी 56 खेळाडू कॅप खेळाडू म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान एक सामना तरी खेळलेले आहेत. तसेच 109 खेळाडू अनकॅप म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न खेळलेले खेळाडू आहेत.

दरम्यान, या 165 खेळाडूंपैकी केवळ 30 खेळाडूंसाठीच पाच संघात मिळून जागा रिक्त आहेत. या 30 जागांमध्ये 9 परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत.

तसेच लिलावासाठी 50 लाख सर्वोच्च मुळ किंमत आहे. या विभागात डिएंड्रा डॉटीन आणि किम गार्थ या दोनच खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच त्यापाठोपाठ 40 लाख मुळ किंमत असलेल्या विभागात 4 खेळाडू आहेत. यात ऍनाबेल सदरलँड, एमी जोन्स, शबनीम इस्माईल आणि जॉर्जिया वेरहॅम यांचा सामावेश आहे. दरम्यान, 40 खालाच्या खालोखाल 30 लाख, 20 लाख आणि 10 लाख अशा मुळ किंमत असलेले विभाग आहेत.

दरम्यान, या लिलावापूर्वीच पाचही संघांनी आपल्या संघात कायम केलेल्या खेळाडूंची यादीत जाहीर केली होती. त्यामुळे आता जेवढ्या जागा रिक्त आहेत, त्या भरण्यासाठी लिलावात संघ प्रयत्न करताना दिसतील. तसेच प्रत्येक संघाला 13.50 कोटी रुपयेच खर्च करता येणार आहेत.

दरम्यान लिलावासाठी गुजराज जायंट्स संघाकडे सर्वाधिस 5.95 कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच सर्वाधिक 10 खेळाडूंसाठी जागाही त्यांच्याकडेच रिकामी आहे.

सर्व संघातील कायम केलेले खेळाडू आणि लिलावासाठी शिल्लक रक्कम

दिल्ली कॅपिटल्स - (संघात रिक्त जागा - 3 (1 परदेशी खेळाडू))

शिल्लक रक्कम - 2.25 कोटी

  • संघात कायम केलेले खेळाडू - ऍलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू.

मुंबई इंडियन्स - (संघात रिक्त जागा - 5 (1 परदेशी खेळाडू))

शिल्लक रक्कम - 2. 1 कोटी

  • संघात कायम केलेले खेळाडू - अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, नताली स्कायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - (संघात रिक्त जागा - 7 (3 परदेशी खेळाडू))

शिल्लक रक्कम - 3.35 कोटी

  • संघात कायम केलेले खेळाडू - आशा शोबाना, दिशा कासट, एलिस पेरी, हिदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन

गुजरात जायंट्स - (संघात रिक्त जागा - 10 (3 परदेशी खेळाडू))

शिल्लक रक्कम - 5.95 कोटी

  • संघात कायम केलेले खेळाडू - ऍश्ले गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर

युपी वॉरियर्स - (संघात रिक्त जागा - 5 (1 परदेशी खेळाडू))

शिल्लक रक्कम - 4 कोटी

  • संघात कायम केलेले खेळाडू - एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्राथ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT