Carlos Alcaraz vs Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Wimbledon 2023: फायनलमध्ये अल्कारेज समोर जोकोविचचे आव्हान, तर 'या' महिला खेळाडूंमध्ये रंगणार अंतिम थरार

Wimbledon 2023: विम्बल्डन 2023 मध्ये रविवारी अल्कारेज आणि जोकोविच यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

Pranali Kodre

Wimbledon 2023 Men's and Women's Final: लंडनमध्ये सध्या विम्बल्डन 2023 स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली असून शनिवारी आणि रविवारी अंतिम सामने खेळले जाणार आहेत. पुरुष आणि महिला एकेरीतीलही अंतिम फेरीत पोहोचणारे खेळाडूही निश्चित झाले आहेत.

महिला एकेरीची अंतिम फेरी

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ट्युनिशियाच्या ऑन्स जेबर आणि चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवा यांनी स्थान मिळवले आहे. दरम्यान जेबर पहिली अरब आणि उत्तर आफ्रिकामधील महिला टेनिसपटू आहे, जी ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.

24 वर्षीय वोंड्रोसोवा चार वर्षांपूर्वी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. पण त्यावेळी ती ऍश्ले बार्टीविरुद्ध पराभूत झाली होती. तिला मागील काही वर्षात दुखापतींचा सामना करावा लागला होता. तिला दोन शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या. पण आता तिने दण्याक्यात पुनरागमन केले आहे.

ऑन्स जेबर आणि मार्केटा वोंड्रोसोवा यांच्यात शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होणार आहे.

पुरुष एकेरीची अंतिम फेरी

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील कार्लोस अल्कारेज आणि दुसऱ्या क्रमांकावरील नोव्हाक जोकोविच यांच्यात सामना होणार आहे. या दोघांनीही उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

दरम्यान 20 वर्षीय अल्कारेजचा हा विम्बल्डनमधील पहिलाच अंतिम सामना असणार आहे. त्याने यापूर्वी 2022 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. पण यंदा त्याच्यासमोर जोकोविचचे आव्हान आहे.

जोकोविच त्याच्या कारकिर्दीतील विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम, तर आठव्यांदा विम्बल्डन जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच तो सलग पाचव्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्याने गेल्या चारही विम्बल्डन स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकले आहे.

अल्कारेज आणि जोकोविच यांच्यातील अंतिम सामना रविवारी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT