Wimbledon 2023: बोपण्णा-एबडन जोडीची उपांत्य फेरीत धडक, 8 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने केला 'हा' पराक्रम

Rohan Bopanna And Matthew Ebden: बोपण्णाने तिसऱ्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली आहे. 43 वर्षीय बोपण्णाने यापूर्वी 2015 मध्ये विम्बल्डनच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.
Rohan Bopanna And Matthew Ebden
Rohan Bopanna And Matthew Ebden Dainik Gomantak
Published on
Updated on

Wimbledon 2023: भारताचा अव्वल दुहेरीतला स्टार खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांनी विम्बल्डनमधील टॅलन ग्रिक्सपूर आणि बार्ट स्टीव्हन्स यांच्याविरुद्ध 6-7, 7-5, 6-7, 6-7, 6-7 असा विजय मिळवत विम्बल्डनमधील आपली स्वप्नवत घोडदौड सुरु ठेवली आहे.

बोपण्णाने तिसऱ्यांदा विम्बल्डनची (Wimbledon) उपांत्य फेरी गाठली आहे. 43 वर्षीय बोपण्णाने यापूर्वी 2015 मध्ये विम्बल्डनच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, 2010 च्या यूएस ओपन उपविजेत्या बोपण्णाने पुरुष दुहेरीत चार ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सहाव्या मानांकित इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीला आता अंतिम फेरी गाठण्यासाठी अव्वल मानांकित नेदरलँड्स आणि वेस्ली कुलहॉफ आणि नील स्कुप्स्की या ब्रिटिश जोडीचे आव्हान पार करावे लागेल.

Rohan Bopanna And Matthew Ebden
Wimbledon 2023: भारताच्या आशेला धक्का! युकी-साकेत जोडीसह बोपन्नाला स्पर्धेतून बाहेर

दुसरीकडे, एक तास 54 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा आणि एबडनने शानदार पुनरागमन केले. पहिला सेट टायब्रेकमध्ये गमावल्यानंतर या जोडीने दुसरा सेट टायब्रेकमध्ये जिंकला. दुसरा सेट जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेल्या इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीने निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com