Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

अर्जुन तेंडुलकर आज IPLमध्ये करणार पदार्पण? मुंबई इंडियन्सने केले ट्विट

आज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही फलंदाजीत योगदान देऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

IPL 2022: आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) हा मोसम काही खास राहिला नाही. पाचवेळा चॅम्पियन मुंबईने त्यांचे मागील पाच सामने गमावले आहेत आणि गुणतालिकेत हा संघ 10व्या स्थानावर आहे. आपल्या पराभवाचा सिलसिला खंडित करण्याच्या इराद्याने मुंबई शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) मैदानात उतरणार आहे. लखनऊने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. जिथे लखनऊ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही अशी अपेक्षा आहे. पण या संघात आज तर मुंबई काही बदल करण्याची शक्यता आहे.

आज अर्जुन तेंडुलकरही आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. आज त्याचा एक फोटो शेअर करत मुंबईने लिहिले की, 'आमच्या मनात आहे.' एवढेच कॅप्शन या ट्विटला देण्यात आहे. मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर इशान किशन रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. पहिल्या दोन सामन्यांमध्ये इशानने एकापाठोपाठ एक अर्धशतके झळकावली होती, मात्र त्यानंतर तो मैदानावर संघर्ष करतांना दिसत आहे.

आज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही फलंदाजीत योगदान देऊ शकतो. शेवटच्या सामन्यात डेव्हाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांनी चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कायरन पोलार्डचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. फलंदाजीशिवाय त्याच्याकडे महत्त्वाच्या विकेट्स घेण्याची क्षमता आहे. अर्जुन तेंडुलकर लखनऊविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.

अर्जून गोलंदाजी सोबतच तो फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मुरुगन अश्विनच्या जागी टायमल मिल्सची निवड होणे जवळपास निश्चित आहे. तर बासिल थंपी आणि जयदेव उनाडकट यांना बाहेर बसावे लागेल. मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar), किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट/बॅसिल थम्पी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

SCROLL FOR NEXT