IPL: 17 धावा करून क्रिकेटपटू केन विल्यम्सने रचला विक्रम

सनरायझर्स संघाने केकेआरचा 7 विकेट्सनी पराभव केला.
Kane Williamson
Kane WilliamsonDainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात खराब सुरुवात करणारा सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ आता पुन्हा विजयी मार्गावर आला आहे. संघाने पहिले दोन सामने गमावले होते, मात्र आता सलग तीन सामने जिंकले आहेत. हैदराबादने शुक्रवारीच कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) 7 विकेट राखून पराभव केला. (Kane Williamson sets new record in IPL)

Kane Williamson
IPL 2022 मधून बाहेर पडलेल्या दीपक चहरने चाहत्यांची मागितली माफी

या सामन्यात कोलकाता संघाने 176 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात हैदराबादने सामना जिंकला. मात्र कर्णधार केन विल्यमसन आपली कमाल दाखवू शकला नाही. तो अवघ्या 17 धावा करून बाद झाला. केवळ 17 धावा करूनही त्याने एक विशेष विक्रम केला आहे. केन विल्यम्सने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये (IPL) 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनीही हैदराबाद संघाकडून खेळताना ही कामगिरी केली आहे. हे दोन्ही खेळाडू आता या संघासोबत खेळत नाहीत. शिखर धवन पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) खेळत आहे, तर वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे.

Kane Williamson
Video: डेविड वॉर्नरवर चढलाय KGF 2चा स्वॅग, म्हणतोय वॉयलेन्स..वॉयलेन्स..वॉयलेन्स

KKR विरुद्धच्या सामन्यानंतर विल्यमसनने हैदराबाद संघासाठी एकूण 2009 धावा केल्या आहेत. तर धवनने 2518 धावा केल्या. यामध्ये वॉर्नर अव्वल स्थानावर आहे. सनरायझर्स संघाने केकेआरचा 7 विकेट्सनी पराभव केला, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कोलकाता संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. संघाकडून नितीश राणाने 36 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. आंद्रे रसेलने 25 चेंडूत 49 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघाने 3 गडी गमावून 176 धावा करत सामना जिंकला. संघाकडून राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावा केल्या, तर एडन मार्कराम 36 चेंडूत 68 धावा करून नाबाद राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com