Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराबाबत महत्वाची बातमी! T20 मध्ये घेणार मोठा ब्रेक; कारण आले समोर..

Jasprit Bumrah Latest News: टी-२० विश्‍वकरंडकाचे मिशन पूर्ण झाल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघ व्यवस्थापनाने आपला मोर्चा आता २०२७ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाकडे वळवला आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : टी-२० विश्‍वकरंडकाचे मिशन पूर्ण झाल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघ व्यवस्थापनाने आपला मोर्चा आता २०२७ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरावरील ताण व तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

२०२७ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया देशांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. जसप्रीत बुमराला पुढील १८ महिने टी-२० द्विपक्षीय मालिकांमध्ये खेळवण्यात येणार नसून फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

आयपीएलची रंगत यावर्षी मार्च ते मे यादरम्यान पाहायला मिळणार आहे. एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या तयारीला यानंतर सुरुवात होणार आहे. आयपीएल संपत असताना निवड समिती सदस्य, प्रशिक्षक गौतम गंभीर, कसोटी कर्णधार शुभमन गिल, सेंटर ऑफ एक्सिलन्सचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Jasprit Bumrah
Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

यामध्ये जसप्रीत बुमराच्या वर्कलोड अर्थातच त्याच्या गोलंदाजीवरील ताण याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये टी-२० प्रकाराची स्पर्धा असेल. तसेच २०२८ ऑलिंपिकमध्येही टी-२०चा समावेश करण्यात आला आहे.

Jasprit Bumrah
Virat Kohli: '..ये ऐसेही किंग नही है'! विराट कोहलीचे सरावाला प्राधान्य; हजारे करंडकमध्ये दिल्लीसाठी खेळणार 3रा सामना

कसोटी क्रिकेट खेळत राहणार

जसप्रीत बुमरासाठी २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी विशेष योजना आखण्यात आली होती. यादरम्यान, तो २१ कसोटी व २१ टी-२० सामने खेळला.

मात्र, एकाही एकदिवसीय सामन्यात त्याला खेळवण्यात आले नाही. आता पुढील वर्षभरात तो एकदिवसीय प्रकारासोबतच कसोटी प्रकारही खेळत राहणार आहे.

कसोटी क्रिकेटबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. मात्र, टी-२० सामन्यांमधून त्याला विश्रांती देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com