चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहर इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2022 च्या हंगामातून बाहेर पडला आहे. त्याला आयपीएल 2022 मध्ये खेळायचे होते आणि तो त्याच्या जुन्या दुखापतीतून सावरत होता, पण त्याच दरम्यान त्याला आणखी एक दुखापत झाली. यामुळे तो आयपीएलच्या 15 व्या मोसमातून बाहेर पडला. चेन्नई (Chennai) संघासाठी हा मोठा धक्का आहे. त्याचवेळी दीपक चहरने भावनिक चिठ्ठी लिहून चाहत्यांची माफी मागितली आहे.
CSK ने 14 कोटी रुपयांना विकत घेतलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) भावनिक चिठ्ठीत लिहिले, "माफ करा मित्रांनो, दुर्दैवाने मी दुखापतीमुळे आयपीएलच्या या मोसमातून बाहेर झालो आहे. मला खेळायचे होते पण दुखापतीमुळे ते शक्य नाही. "नेहमीप्रमाणेच अधिक चांगले आणि मजबूत परत येईन. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांनी मला नेहमीच साथ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. लवकरच भेटू."
विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान दीपक चहरच्या पायाला दुखापत झाली होती. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या बाहेर होता आणि पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता. दरम्यान, आयपीएल (IPL) 2022 ची तयारी करत असताना, दीपक चहरला पाठीला दुखापत झाली आणि तो आयपीएलच्या 15 व्या हंगामातून पूर्णपणे बाहेर पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.