Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

Ishan Kishan: इशान किशन ठरला मालिकावीर, पण भारतीय टीम मॅनेजमेंटची वाढली डोकेदुखी

India vs West Indies: इशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावल्याने भारतीय संघव्यवस्थापनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Pranali Kodre

Ishan Kishan puts big questions in front of India Team management : भारताने वेस्ट इंडिजला मंगळवारी त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 200 धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने या विजयाबरोबरच मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला.

भारताच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तिन्ही वनडे सामन्यात अर्धशतके झळकावली. त्याने या मालिकेत अनुक्रमे 52, 55 आणि 77 धावांच्या खेळी केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

मात्र, त्याच्या या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय निवड समिती आणि भारतीय संघव्यवस्थापनेला डोकेदुखीला सामोरे जावे लागणार आहे. पण ही चांगली डोकेदुखी असेल.

इशानने वाढवली डोकेदुखी

इशानने सलग तीन अर्धशतके ठोकत वर्ल्डकप 2023 साठीही प्रबळ दावेदारी ठोकली आहे. भारताकडे सध्या वर्ल्डकप 2023 साठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतचा पर्याय असण्याची शक्यता कमी आहे.

अपघातानंतर पंतमध्ये जलद गतीने सुधारणा झाली असली, तरी तो वर्ल्डकप 2023 पर्यंत पूर्ण तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच भारतीय संघ यष्टीरक्षण फलंदाजीसाठी अन्य पर्यायाचाही विचार करत आहे.

सध्या इशान किशन, संजू सॅमसन आणि केएल राहुल यांचे पर्याय आहेत. त्यातही अशी चर्चा होती की केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती दिली जाईल. मात्र आता इशानने सलग तीन अर्धशतकांसह आपला दावाही मजबूत केला आहे.

इतकेच नाही, तर इशान सलामी फलंदाजीसाठी आणखी एक पर्याय देऊ शकतो. तो केएल राहुल प्रमाणेच कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याच सक्षम आहे, तसेच तो डावखुरा फलंदाज असल्याने ही त्याच्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी करत असल्याने फलंदाजीच्या वरच्या फळीत डाव्या-उजव्याचे चांगले संमिश्रणही करता येऊ शकते.

त्याचमुळे आता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संधी द्यावी, हा मोठा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनासमोर असणार आहे. याबाबत ते पुढील काही मालिकांमधून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतात.

दरम्यान, इशानच्या एकूण वनडे कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 17 सामने खेळले असून 46.26 च्या सरासरीने 694 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT