WI vs IND 3rd ODI: इशान किशनने रचला मोठा इतिहास, कॅप्टन कूलनंतर अशी करणारा ठरला दुसरा भारतीय!

WI vs IND 3rd ODI: भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. इशानने आणखी एक अर्धशतकी खेळी खेळली.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

WI vs IND 3rd ODI: भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. इशानने आणखी एक अर्धशतकी खेळी खेळली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 64 चेंडूत 77 धावांची तूफानी खेळी खेळली.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील इशानचे हे तिसरे अर्धशतक आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 52 तर दुसऱ्या सामन्यात 55 धावा केल्या. इशानने सलग तीन अर्धशतके झळकावून मोठा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, तो दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

दरम्यान, एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा इशान दुसरा भारतीय विकेटकीपर बनला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम भारताचा माजी कर्णधार आणि महान यष्टिरक्षक एमएस धोनीने केला होता.

2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत धोनीने तीन अर्धशतके ठोकली होती. एकदिवसीय मालिकेत ही कामगिरी करणारा इशान हा सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

1982 मध्ये कृष्णम्माचारी श्रीकांत, 1985 मध्ये दिलीप वेंगसरकर आणि 1993 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांनी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग तीन वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.

Ishan Kishan
WI vs IND 3rd ODI: 10 वर्षांपासून दुर्लक्षित खेळाडूला पांड्यानं हेरलं! टीम इंडियात दिली संधी

दुसरीकडे, तिसर्‍या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने नाणेफेक हरल्यानंतर दमदार सुरुवात केली. इशान आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली.

वेस्ट इंडिजमध्ये भारतासाठी ही सर्वात मोठी वनडे ओपनिंग भागीदारी आहे. भारताला पहिला धक्का 20 व्या षटकात इशानच्या रुपाने बसला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याला यानिक कॅरियाने यष्टिचित केले.

तर तब्बल 10 महिन्यांनंतरही ऋतुराजची बॅट भारतासाठी (India) चालली नाही. त्याने 14 चेंडूत 10 धावा केल्यानंतर विकेट गमावली. 23व्या षटकात त्याला अल्झारी जोसेफने ब्रँडन किंगच्या हाती झेलबाद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com