Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: 'नॉट बॅड ऋषभ!', मदतीशिवाय पंतने चढल्या पायऱ्या, Video पाहून चाहतेही सुखावले

अपघातातून झालेल्या दुखापतींमधून सावरत असलेल्या ऋषभ पंतचा पायऱ्या चढतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Pranali Kodre

Rishabh Pant video of climbing stairs without support: भारतीय क्रिकेट संघाने कसोटी चॅम्पियशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावांनी पराभव स्विकारला. त्यामुळे या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, या सामन्यात अनेकांना यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची आठवण झाली. अनेक चाहत्यांनी असेही म्हटले की भारतीय संघाल पंतची कमी जाणवली. पंत गेल्या वर्षांच्या अखेरीस गंभीर कार अपघातात झालेल्या दुखापतींमधून सावरत आहे.

पण तो या दुखापतीतून चांगल्या प्रकारे सावरत असल्याचेच दिसून आले आहे. त्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा व्हिडिओ पाहून अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला आहे. कारण या व्हिडिओमध्ये पंत कोणत्याही मदतीशिवाय पायऱ्या चढताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आधी पंत आधार घेत पायऱ्या चढताना दिसत आहे. त्यावेळी त्याला त्रासही होताना दिसत आहे. पण त्यानंतर तो कोणत्याही आधाराशिवाय सहज पायऱ्या चढताना दिसत आहे. यातून त्याने त्याच्या तंदुरुस्तीत झालेला फरक दर्शवला आहे. त्यामुळे आता ललकरच तो पूर्ण तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी बाळगली आहे.

पंतचा डिसेंबर 2022 अखेरीस दिल्लीवरून रुडकीला येताना गंभीर कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला काही गंभीर जखमाही झाल्या. तसेच त्याची कार पूर्ण जळाली होती. पण सुदैवाने तो या गंभीर कार अपघातातून बचावला.

याच अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याचमुळे त्याला गेल्या 6 महिन्यांपासून क्रिकेटमधून दूर रहावे लागले आहे.

पंतची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

पंतने आत्तापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 43.67 च्या सरासरीने आणि 5 शतकांसह 2271 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 30 वनडे सामन्यांमध्ये 34.60 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 865 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 987 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने यष्टीरक्षण करताना 129 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 190 विकेट्स घेतल्या. यात 166 झेलांचा आणि 24 यष्टीचीतचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

SCROLL FOR NEXT