Jaydev Unadkat Twitter/ @cricbuzz
क्रीडा

WI vs IND 3rd ODI: 10 वर्षांपासून दुर्लक्षित खेळाडूला पांड्यानं हेरलं! टीम इंडियात दिली संधी

WI vs IND 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Manish Jadhav

WI vs IND 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियामध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्याने तिसर्‍या वनडेसाठी स्टार गोलंदाज जयदेव उनाडकटला 10 वर्षांनंतर प्लेइंग 11 मध्ये परत आणले आहे.

दरम्यान, फॉर्ममध्ये नसलेल्या उमरान मलिकच्या जागी जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. उमरान पहिल्या दोन वनडेत फ्लॉप ठरला होता. त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 2 सामन्यात 6 षटके टाकली. आपली छाप सोडण्यात तो अपयशी ठरला होता.

शेवटची वनडे 2013 मध्ये खेळला होता

जयदेव उनाडकटने टीम इंडियासाठी (Team India) शेवटचा सामना 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. यानंतर तो एकदिवसीय संघात पुनरागमन करु शकला नाही.

या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. उनाडकटला आयपीएल 2023 पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत स्थान मिळाले, परंतु तो प्लेइंग 11 चा भाग होऊ शकला नाही.

जयदेव उनाडकटची क्रिकेट कारकीर्द

दुसरीकडे, उनाडकटच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने भारतासाठी 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 विकेट घेतल्या आहेत. त्याने 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 14 विकेट घेतल्या आहेत.

त्याने 4 कसोटी सामन्यात 3 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, उनाडकटने 103 प्रथम श्रेणी सामन्यात 382 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर, त्याने 116 लिस्ट-ए सामन्यात 168 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन: ब्रॅंडन किंग, काइल मायर्स, अॅलिक अथनाझे, शाई होप (wk/c), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT