IND vs WI: T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, 'या' 2 दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी

IND vs WI, T20 Series: रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील हा 15 सदस्यीय संघ टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरेल. परंतु प्रत्येक सामन्यासाठी 13 खेळाडू निवडले जातील.
West Indies Team
West Indies Team Dainik Gomantak
Published on
Updated on

IND vs WI, T20 Series: वेस्ट इंडिजने तरौबा येथे गुरुवारपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विकेटकीपर फलंदाज शाई होप आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांचा त्यांच्या 15 सदस्यीय संघात समावेश केला आहे.

रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील हा 15 सदस्यीय संघ टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरेल. परंतु प्रत्येक सामन्यासाठी 13 खेळाडू निवडले जातील, ज्यामधून प्लेइंग इलेव्हनची निवड केली जाईल.

टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर

भारताविरुद्धच्या (India) तीन एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करणाऱ्या 29 वर्षीय शाई होपने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताच्या दौऱ्यात कोलकाता येथे शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता.

दुसरीकडे, 26 वर्षीय थॉमसने डिसेंबर 2021 मध्ये कराचीमध्ये शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. काइल मायर्सची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजच्या (West Indies) निवड समितीचे अध्यक्ष डेसमंड हेन्स यांनी सांगितले की, पुढील वर्षी मायदेशात होणार्‍या आयसीसी मेन्स टी-20 विश्वचषकाला लक्षात घेऊन संघाची निवड करण्यात आली आहे.

West Indies Team
IND vs WI: मालिकेवर कब्जा करण्यासाठी रोहित सेना सज्ज! पुन्हा दिसणार 'ही' जोडी

या 2 धोकादायक खेळाडूंची अचानक एन्ट्री

डेसमंड हेन्स म्हणाले की, 'आम्ही योग्य संयोजन शोधत असताना विविध योजनांवर काम करत आहोत. आम्हाला असा संघ तयार करायचा आहे की आम्ही पुढील वर्षी आयोजित करत असलेल्या जागतिक स्पर्धेत आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकेल.

त्रिनिदादच्या तरौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी गुरुवारी पहिल्या सामन्याचे आयोजन करेल. यानंतर, दोन्ही संघ गयाना नॅशनल स्टेडियमवर जातील, जिथे दुसरा आणि तिसरा सामना 6 आणि 8 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. या मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे होणार आहे.

वेस्ट इंडिज संघ:

रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मायर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.

West Indies Team
WI vs IND, 2nd ODI: 'मी कासव आहे, पण...', पराभवानंतर हार्दिकचे भाष्य; कोच द्रविडनेही दिले स्पष्टीकरण

टीम इंडिया:

इशान किशन (विकेटकीप), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com