Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: जयस्वाल का खेळला नाही पहिला T20I सामना? BCCI कडूनच मोठा खुलासा

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालला अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या T20I साठी टीम इंडियात संधी का मिळाली नाही, याबद्दल बीसीसीआयनेच खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal misses out of India vs Afghanistan 1st T20I at Mohali:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारपासून (11 जानेवारी) टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेकजण चकीत झाले. मात्र, या सामन्यादरम्यान बीसीसीआयने तो अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यासाठी उपलब्ध नसण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार जयस्वालच्या उजव्या मांडीला सुज असल्यामुळे पहिल्या टी20 सामन्यासाठी उपलब्ध राहू शकला नाही.

खरंतर पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी (10 जानेवारी) भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले होते की कर्णधार रोहित शर्माबरोबर यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजी करेल.

त्याचमुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असेल, असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र, तो अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने अखेर त्याला बाहेर बसावे लागले आहे. त्यामुळे आता रोहितबरोबर पहिल्या टी20 सामन्यामध्ये शुभमन गिल सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.

रोहितचे 14 महिन्यांनी पुनरागमन

रोहित शर्माही तब्बल 14 महिन्यांनंतर भारताकडून टी20 क्रिकेट खेळण्यासाठी उतरला आहे. खरंतर त्याला आणि विराट कोहलीला नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीतील पराभवानंतर पहिल्यांदाच भारताच्या टी२० संघात संधी मिळाली आहे.

मात्र, विराट वैयक्तिक कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी उपलब्ध राहू शकला नाही. मात्र, तो दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाशी जोडला जाणार आहे.

दरम्यान रोहित पहिल्या टी20 सामन्यात खेळत आहे. विशेष म्हणजे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्वही करणार आहे.

पहिल्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ -

  • रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT