ICC ने वाढवले केपटाऊनचे टेंशन! SA vs IND सर्वात छोट्या कसोटीच्या खेळपट्टीला दिलं 'हे' रेटिंग

South Africa vs India: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनला झालेल्या कसोटीतील खेळपट्टीला आयसीसीकडून रेटिंग देण्यात आले आहे.
South Africa vs India
South Africa vs IndiaX/BCCI
Published on
Updated on

ICC rated Cape Town Newlands pitch Unsatisfactory after South Africa vs India Test completed in two days:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात जानेवारी 2024 च्या सुरुवातीचा कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमधील न्युलँड्स स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात भारताने 4 जानेवारीला दीडच दिवसात 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत बरोबरी साधली होती.

दरम्यान, हा सामना अवघ्या 107 षटकात संपला होता. त्यामुळे हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामनाही ठरला होता. मात्र, या सामन्यानंतर न्युलँड्स स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा झाली.

आता याच खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषजेकडून रेटिंग देण्यात आले आहे. आयसीसीने या खेळपट्टीला असमाधानकारक (unsatisfactory) असे रेटिंग दिले आहे.

South Africa vs India
ICC Awards 2023: सर्वोत्तम कसोटीपटूसाठी भारताच्या एकमेव खेळाडूला नामांकन, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडूही शर्यतीत

आयसीसी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी आपला अहवाल सादर केला, ज्यात सामना अधिकार्‍यांबद्दल चिंता व्यक्त केली गेली आणि मूल्यांकनानंतर केपटाऊनमधील न्यूलँड्सची खेळपट्टी 'असमाधानकारक' असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अत्यंत अवघड होते.

दरम्यान, ज्या खेळपट्टीला असमाधानकारक असे रेटिंग दिले जाते, त्या खेळपट्टीला एक डिमिरीट पाँइट्स देण्यात येतो. त्यामुळे न्यूलँड्सच्या खेळपट्टीलाही एक डिमिरीट पाँइंट मिळाला आहे. हे पाँइंट्स 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत सक्रिय असतात.

जर एखाद्या खेळपट्टीला 6 डिमिरीट पाँइंट्स मिळाले, तर 12 महिने त्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन होऊ शकत नाही. तसेच जर 12 डिमिरीट पाँइंट्स मिळाले, तर 24 महिन्यांसाठी त्या खेळपट्टीवर सामना होऊ शकत नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आता दक्षिण आफ्रिका आयसीसीने न्युलँड्सच्या खेळपट्टीला दिलेल्या असमाधानकारक रेटिंगच्या विरुद्ध 14 दिवसात अपील करू शकतात.

South Africa vs India
Player of the Month: डिसेंबरमधील बेस्ट क्रिकेटरच्या शर्यतील दोन भारतीय खेळाडू, ICC ने जाहीर केली नामांकने

या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी तब्बल 23 विकेट्स गेल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच भारतीय संघही पहिल्या डावात 34.5 षटकात 153 धावांवर सर्वबाद झाला होता. पण भारताने पहिल्या डावात 98 धावांची आघाडी घेतली होती.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 36.5 षटकात 176 धावा केल्या. त्यामुळे त्यांनी भारतासमोर 79 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 12 षटकात 3 विकेट्स गमावत 80 धावा करून पूर्ण केले.

रोहितने म्हटले होते भेदभाव न करता द्या रेटिंग

केपटाऊन कसोटी संपल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले होते की सामनाधिकाऱ्यांनी भेदभाव न करता खेळपट्ट्यांना रेटिंग द्यायला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com