Ruturaj Gaikwad 
क्रीडा

SA vs IND: ...म्हणून ऋतुराज गायकवाड तिसऱ्या वनडेतून झाला बाहेर, BCCI दिली मोठी अपडेट

Ruturaj Gaikwad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत असलेल्या तिसऱ्या वनडेतून ऋतुराज गायकवाड बाहेर होण्यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

BCCI Clarify why Ruturaj Gaikwad not available for South Africa vs India 3rd ODI:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात गुरुवारी (21 डिसेंबर) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. पार्लला होत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्याला भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड मुकला आहे.

ऋतुराज गायकवाड तिसऱ्या वनडेत न खेळण्याचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाली आहे.

बीसीसीआयने याबद्दल पोस्ट केली आहे की 'ऋतुराज गायकवाड दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणावेळी अनामिकेला (करंगळी शेजारील बोटाला) झालेल्या बोटाच्या दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नाही. त्याच्यावर सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऋतुराज या वनडे मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे जर तो बोटाच्या दुखापतीतून पूर्ण सावरला नाही, तर त्याचे या कसोटी मालिकेत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

ऋतुराजच्या जागेवर पाटीदारला संधी

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऋतुराजच्या जागेवर रजत पाटीदारला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटीदारचे या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. तो भारताकडून वनडेत पदार्पण करणारा 255 वा खेळाडू आहे.

मात्र, रजतला पदार्पणात मोठी खेळी करण्यात मात्र अपयश आले. त्याला साई सुदर्शनबरोबर सलामीला फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र तो 22 धावांवर बाद झाला.

या सामन्यासाठी कुलदीप यादवलाही विश्रांती देण्यात आली असून वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

अशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, अवेश खान, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT