SA vs IND, ODI: भारताकडून 'या' खेळाडूचे पदार्पण! 'करो वा मरो' सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग-11

South Africa vs India: भारताविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे.
South Africa vs India
South Africa vs IndiaBCCI
Published on
Updated on

South Africa vs India 3rd ODI at Paarl, Playing XI :

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात गुरुवारी (21 डिसेंबर) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना होत आहे. पार्लला होत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. भारताकडून रजत पाटीदारचे पदार्पण झाले आहे. त्याला ऋतुराज गायकवाडच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाली असल्याची माहिती भारताचा कर्णधार केएल राहुलने दिली. तसेच कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली असून वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.

South Africa vs India
IND vs SA: शुभमन, रोहित, कोहलीनंतर केएल राहुलची खास कामगिरी; द्रविडचा मोडला 19 वर्ष जुना विक्रम!

याशिवाय दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात खेळलेला 11 जणांचा संघच या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसणार आहे.

निर्णायक सामना

तिसरा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेसाठी निर्णायक सामना आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणारा संघ ही मालिकाही जिंकेल.

South Africa vs India
SA vs IND: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचं कुठे चुकलं, ज्यामुळे झाला पराभव? कर्णधार राहुल म्हणाला...

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, अवेश खान, मुकेश कुमार

  • दक्षिण आफ्रिका - रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झॉर्झी, रॅस्सी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्युरन हेंड्रिक्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com