Rinku Singh 
क्रीडा

IND vs AUS: रिंकूने शेवटच्या बॉलवर सिक्स मारूनही मिळाल्या नाहीत सहा धावा, पण का? घ्या जाणून

Rinku Singh Six: गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या चेंडूवर रिंकू सिंगने षटकार मारूनही त्याचा हा षटकार का ग्राह्य धरण्यात आला नाही, जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia, 1st T20I Match, Rinku Singh Six:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारी (23 नोव्हेंबर) पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. विशाखापट्टणमला झालेला हा सामना भारताने अखेरच्या चेंडूवर 2 विकेट्सने जिंकला. अखेरच्या चेंडूवर नाट्यमय घटनाही घडल्याचे दिसले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज होती. त्यावेळी स्ट्राईकवर रिंकू सिंग फलंदाजी करत होता, तर ऑस्ट्रेलियाकडू सीन ऍबॉट गोलंदाजी करत होता.

यावेळी रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर लाँग ऑनला खणखणीत षटकार मारला. मात्र, हा चेंडू टाकताना ऍबॉटचा पाय क्रिजच्या पुढे पडल्याने तो नो बॉल झाला. त्याचमुळे रिंकूने षटकार मारूनही त्याच्या आणि भारताच्या खात्यात 6 धावा जमा झाल्या नाहीत.

कारण ज्याक्षणी ऍबॉटने पाय पुढे टाकला, त्याचक्षणी नो-बॉलची एक धाव भारताला मिळाली होती, त्यामुळे त्याचवेळी भारतीय संघ विजयी झाला होता. त्यामुळे रिंकूचा षटकार ग्राह्य धरण्यात आला नाही.

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकू सिंग 14 चेंडूत 22 धावांवर नाबाद राहिला. त्याचबरोबर भारताकडून कर्णधार सूर्यकुमारने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने 41 चेंडूत 52 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT