IND vs AUS, T20: पहिल्याच सामन्याच कॅप्टन सूर्या तळपला! केएल राहुलच्या विक्रमाची केली बरोबरी

Suryakumar Yadav: कर्णधार सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात अर्धशतक करत मोठा विक्रम केला आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavBCCI
Published on
Updated on

India vs Australia, 1st T20I Match at Visakhapatnam, Captain Suryakumar Yadav Fifty Record:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना गुरुवारी (23 नोव्हेंबर) विशाखापट्टणमला पार पडला. या सामन्यात भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादवने महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने 19.5 षटकात पूर्ण केले. यावेळी सूर्यकुमारने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली.

Suryakumar Yadav
KL Rahul: 'विराट, आपण सहज जिंकू, कर सेंच्यूरी...' म्हणत केएलने जिंकले कोट्यवधी चाहत्यांचे हृदय

विशेष म्हणजे सूर्यकुमारचा हा कर्णधार म्हणून पहिला सामना होता. त्यामुळे तो कर्णधार म्हणून पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अर्धशतक करणारा भारताचा दुसराच खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी केएल राहुलने असा विक्रम केला होता. केएल राहुलने 8 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध टी20 सामन्यात नेतृत्व केले होते. या सामन्यात त्याने 41 चेंडूत 62 धावांची खेळी केली होती. तो सामना भारताने 101 धावांनी विजय मिळवला होता.

सूर्यकुमारचे 100 षटकारही पूर्ण

सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त षटकारही मारले आहेत. यामध्ये आता त्याने तिसऱ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना त्याने 100 षटकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना 100 षटकार मारणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.

यापूर्वी ओएन मॉर्गन, विराट कोहली आणि डेव्हिड मिलर यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तिसऱ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना असा कारनामा केला आहे. मॉर्गनने 107 डावात 120 षटकार मारले आहेत. तसेच विराटने 98 डावात 106 षटकार मारलेत, तर मिलरने 98 डावात 105 षटकार मारले आहेत.

Suryakumar Yadav
World Cup 2023: 'ऑस्ट्रेलियाने फसवलं...', कमिन्सने पहिली बॉलिंग घेण्यामागच्या कारणाचा अश्विनकडून खुलासा

भारताचा विजय

गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने 41 चेंडूत 52 धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार व्यतिरिक्त इशान किशनने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा केल्या, तर रिंकू सिंगने 14 चेंडूत 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com