Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Gujarat Titans Jersey: ...म्हणून गुजरातचे खेळाडू हैदराबादविरुद्ध घालणार लेवेंडर जर्सी, जाणून घ्या कारण

सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स संघ लेवेंडर रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

Pranali Kodre

Gujarat Titans wearing lavender jersey: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुजरात संघ नेहमीपेक्षा वेगळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

गुजरात या सामन्यात लेवेंडर रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. यामागील कारण म्हणजे गुजरात या सामन्यातून कर्करोगाविरुद्ध जनजागृती करणार आहेत. त्याच कारणाने ते नेहमीच्या निळ्या रंगाची जर्सी न घालता लेवेंडर जर्सी घालणार आहेत.

या उपक्रमाबद्दल गुजरातचे सीओओ म्हणाले, 'कर्करोगामुळे जगभरात लाखो लोकांचे मृत्यू होतात आणि त्याचा रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घातक परिणामही होतात. कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्हाला आनंद होत आहे, ज्यात केवळ लोकांना लवकर लक्षणे ओळखण्याच्या महत्त्वाबद्दलच शिक्षित करण्याचा प्रयत्न नाही तर कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित करणार आहे.'

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, 'कर्करोग हे भारतातील आणि जगभरातील लाखो लोका लढत असलेली लढाई आहे आणि एक संघ म्हणून, या प्राणघातक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही आमची जबाबदारी समजतो.'

'लॅव्हेंडर जर्सी घालणे हा कर्करोग रुग्ण, त्यातून वाचलेले आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आम्हीही आहोत, हे दाखवण्याचा आमचा मार्ग आहे. आम्हाला आशा आहे की आमची कृती इतरांना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आणि ही लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रेरणा देईल.'

दरम्यान गुजरात संघाच्या आयपीएल २०२३ मधील कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी आत्तापर्यंत १२ सामने खेळले असून ८ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर ४ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे गुजरात सध्या १६ गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT