Rameshbabu Praggnanandhaa Dainik Gomantak
क्रीडा

R Praggnanandhaa: कार्लसनविरुद्ध चेस वर्ल्डकप फायनल खेळणारा कोण आहे आर. प्रज्ञान्नंद?

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञान्नंद दिग्गज मॅग्नस कार्लसनविरुद्ध चेस वर्ल्डकप फायनल खेळणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Who is R Praggnanandhaa?: जागतिक बुद्धीबळ संघटनेकडून घेण्यात येणारी वर्ल्डकप चेस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारतासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञान्नंद चेस वर्ल्डकप फायनल खेळणार आहे.

आता हा प्रज्ञानंद कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुकही असतील. चला तर जाणून घेऊयात या खेळाडूविषयी.

अवघं १८ वर्ष वय असलेला आर. प्रज्ञानंद सर्वात कमी वयाचा विश्वचषक फायनल खेळणार खेळाडू ठरला आहे.

१८ वर्षाच्या आर प्रज्ञान्नंदने सेमीफायनल मध्ये अमेरिकेचा अनुभवी खेळाडू फॅबियानो कॅरुआनाला पराभूत करत बुद्धिबळ विश्‍वकरंडकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि जगभर त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली. विश्वनाथ आनंद नंतर वर्ल्डकपमध्ये खेळणारा प्रज्ञान्नंद भारताचा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

त्याच्या यशाबद्दल बोलताना त्याचे वडील रमेशबाबूंनी त्यांच्या मुलांना चेस खेळण्याची आवड कशी लागली याची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात माझ्या मुलीला वैशालीला टीव्ही बघण्याची सवय लागली होती.

टीव्हीपासून दूर करण्यासाठी बुद्धिबळ आणून दिले, पण वैशाली व प्रज्ञानंद या दोघांनाही या खेळाची गोडी लागली. दोघांनीही या खेळामध्येच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचे बुद्धिबळवरील प्रेम पाहून आनंद वाटत असल्याचा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या यशाचे श्रेय रमेशबाबू प्रग्नानंदच्या आईला देतात.

तमिळनाडूच्या प्रज्ञानंदला बुद्धीबळाची आवड अगदी लहान वयात लागली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तो इंटरनॅशनल मास्टर बनला होता. आणि १२ व्या युवा ग्रँडमास्टर बनला होता.

आता फायनलमध्ये त्याची लढत बुद्धीबळात जगात सर्वेत्तम मानल्या जाणाऱ्या मॅग्नस कार्लसनबरोबर असणाऱ आहे...हे दोन खेळाडू याआधीही २०२२ मध्ये आमनेसामने आले होते. प्रग्नानंदने वयाच्या 16 वर्षी वर्ल्ड चॅपिंयन मॅग्नस कार्लसनला हरवत रेकॉर्ड केला होता.

मॅग्नस कार्लसनने 2013 मध्ये विश्वनाथ आनंदला हरवत वर्ल्ड चेस चॅपिंयनशीप आपल्या नावावर केली होती.

आज जर प्रग्नानंदने मॅग्नस कार्लसनबरोबरची ही लढत जिंकली तर भारत इतिहास रचणार आहे.संपुर्ण जगाचं लक्ष चेस वर्ल्डकपकडे लागले आहे. आर. प्रज्ञानंद मॅग्नस कार्लसनला यांची लढत कशी असणार आहे आणि या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT