FIDE Women’s World Cup 2023: महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचणारी कोण आहे अलेक्झांड्रा गोर्याचकिना, वयाच्या 6 व्या वर्षी...

Who is Aleksandra Goryachkina: महिला बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात रशियाची ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा गोर्याचकिना हिने आश्चर्यकारक कामगिरी केली.
 Aleksandra Goryachkina
Aleksandra GoryachkinaDainik Gomantak
Published on
Updated on

Who is Aleksandra Goryachkina: महिला बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात रशियाची ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा गोर्याचकिना हिने आश्चर्यकारक कामगिरी केली. तिने नर्ग्युल सालिमोवाचा पराभव करुन विजेतेपद पटकावले.

विजेतेपदाच्या सामन्याच्या दुसऱ्या 25'+10" रॅपिड टायब्रेक गेममध्ये, अलेक्झांड्राने शानदार विजय मिळवला. पहिला सेट बरोबरीत संपला होता.

दरम्यान, अलेक्झांड्रा गोर्याचकिना हिने 2021 मध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतही अप्रतिम कामगिरी केली होती. त्यावेळी ती उपविजेती ठरली होती. यावेळी मात्र, तिने विजेतेपदला गवसणी घातली.

विजेतेपदासाठी तिला 50 हजार डॉलर्स म्हणजेच 41 लाख 55 हजार 375 रुपये, तर उपविजेत्या नर्ग्युल सालिमोवाचा 35 हजार डॉलर्स म्हणजेच 29 लाख 9 हजार 635 रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे. वयाच्या 24 व्या वर्षी इतिहास रचणारी अलेक्झांड्रा गोर्याचकिना कोण आहे ते जाणून घेऊया...

 Aleksandra Goryachkina
Chess World Cup 2023: प्रज्ञानानंदने गाठली अंतिम फेरी, आता जगातील अव्वल खेळाडूशी होणार मुकाबला!

कोण आहे अलेक्झांड्रा गोर्याचकिना

अलेक्झांड्रा युरिएव्हना गोर्याचकिना रशियाची (Russia) आहे. अगदी लहान वयातच तिने बुद्धिबळाच्या जगात मोठे नाव कमावले. 24 वर्षीय गोर्याचकिनाकडे ग्रँडमास्टरची पदवी आहे.

FIDE (Fédération Internationale des Échecs) रेटिंगनुसार ती Hou Yifan नंतर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर येते. विशेष म्हणजे 2611 च्या सर्वोच्च रेटिंगसह, ती बुद्धिबळ इतिहासातील चौथी सर्वोच्च रेटिंग असलेली महिला आणि आतापर्यंतची सर्वोच्च रेटिंग मिळवणारी रशियन महिला आहे.

 Aleksandra Goryachkina
T20 World Cup: क्लोज मॅचमध्ये बांगलादेशचा 5 धावांनी पराभव, भारतीय संघाने गाठली उपांत्य फेरी

वयाच्या 6 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला शिकले

- गोर्याचकिनाला सुरुवातीला बुद्धिबळात (Chess) रस नव्हता. तिची आवड टेबल टेनिस आणि डान्स होती, पण शेवटी ती बुद्धिबळात मास्टर बनली. वयाच्या 6 व्या वर्षी तिने बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली आणि आज संपूर्ण जग तिला ओळखते.

- अलेक्झांड्रा युरिएव्हना गोर्याचकिनाचे वडिल बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत. तिच्या आई आणि वडिलांचे रेटिंग 200 च्या वर आहे.

- अलेक्झांड्रा युरिएव्हना गोर्याचकिना ही तीन वेळा रशियन महिला बुद्धिबळ चॅम्पियन ठरली आहे. तिने 2015, 2017 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

- अलेक्झांड्रा युरिएव्हना गोर्याचकिना, वयाच्या 13 व्या वर्षी, गोर्याचकिना हौईफान आणि कॅटरिना लाग्रो यांच्यानंतरची तिसरी सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर आहे.

- 2020 च्या महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र, तिला झू वेनजुनकडून रॅपिड टायब्रेकमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com