Magnus Carlsen & Karthikeyan Murali  Dainik Gomantak
क्रीडा

जगातील नंबर वन बुद्धिबळपटूला पराभूत करणारा कोण आहे कार्तिकेयन मुरली?

Manish Jadhav

Karthikeyan Murali: बुद्धिबळ विश्वचषक 2023 चा विजेता आणि जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला भारतीय खेळाडूंकडून सतत स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. ऑगस्ट 2023 मधील विश्वचषक फायनलमध्ये, मॅग्नस कार्लसन आणि भारतीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रग्नानंदन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.

आता मॅग्नस कार्लसनचा भारतीय खेळाडूने पराभव केला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून 24 वर्षीय ग्रँडमास्टर कार्तिकेयन मुरली आहे, ज्याने जगातील नंबर वन बुद्धिबळपटूला पराभूत केले आहे.

दरम्यान, कार्तिकेयन मुरलीने जगातील नंबर वन खेळाडू मॅग्नस कार्लसनला मोठा धक्का दिला. सध्या सुरु असलेल्या कतार मास्टर्समध्ये, कार्तिकेयनने क्लासिकल बुद्धिबळ फॉर्मेटमध्ये कार्लसनविरुद्ध विजय मिळवला.

विशेष म्हणजे, भारतासाठी (India) मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. कार्तिकेयन मुरलीपूर्वी मॅग्नस कार्लसनला पेंटाला हरिकृष्णा आणि विश्वनाथन आनंद यांनी पराभूत केले होते.

दुसरीकडे, कार्तिकेयन मुरलीचा विजय कतारमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेच्या सातव्या फेरीत आला, जिथे त्याने काळ्या मोहरांचा कुशलतेने वापर केला.

या महत्त्वाच्या विजयासह तो SL नारायण, जावोखिर सिंदारोव, डेव्हिड परव्यान, अर्जुन एरिगेसी आणि नोदिरबेक याकुबोएव यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंच्या पंक्तीत सामील झाला, या सर्वांनी 7 पैकी 5.5 गुण मिळवले होते.

चेसबेसच्या मते, कार्तिकेयन मुरली हा क्लासिकल गेममध्ये मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तिसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. 2005 मध्ये कार्लसन 14 वर्षांचा असताना पेंटाला हरिकृष्णाने त्याचा पराभव केला होता.

त्याचबरोबर, विश्वनाथन आनंदनेही कार्लसनचा पराभव केला असून आता कार्तिकेयन मुरली या यादीत सामील झाला आहे.

कोण आहे कार्तिकेयन मुरली?

कार्तिकेयन मुरली तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावर येथे जन्मलेला हा एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे, ज्याला 2015 मध्ये FIDE द्वारे ग्रँडमास्टर ही पदवी प्रदान करण्यात आली होती. 24 वर्षीय कार्तिकेयनही दोन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिला आहे.

वयाच्या पाचव्या वर्षी तो बुद्धिबळ खेळायला शिकला. यावरुन असा अंदाज लावता येतो की, या खेळातील बारकावे त्याने लहानपणीच आत्मसात केले होते. टूर्नामेंट एज ग्रुपमध्ये तो अनेक स्पर्धा जिंकला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT