Virat Kohli | Ricky Ponting Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मैदानात भिडण्यापूर्वी विराट-पाँटिंगची खास भेट, ज्यूनियर रिकीनंही वेधलं लक्ष; पाहा Video

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी विराट कोहली आणि रिकी पाँटिंगची झालेल्या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Ricky Ponting Meets Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये भारताबरोबरच अनेक परदेशी खेळाडूही खेळताना दिसतात. त्यामुळे विविध देशांतील खेळाडूंमध्ये झालेली मैत्रीही पाहायला मिळते. तसेच अनेक खेळाडू एकमेकांशी बोलून चर्चा करताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला असून ज्यात रिकी पाँटिंग आणि विराट कोहली चर्चा करताना दिसत आहेत.

शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्याआधी विराट आणि पाँटिंग भेटले आहेत. पाँटिंग दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, तर विराट आरसीबीचा प्रमुख फलंदाज आहे.

दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर विराट आणि पाँटिंग यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या भेटीदरम्यान पाँटिंगचा मुलगा फ्लेचर देखील उपस्थित होता. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'जेव्हा रिकी कोहलीला भेटतो. एक्सटेंडेड केमियो - रिकी ज्यूनियर'.

या व्हिडिओमध्ये दिसते की पाँटिंग त्याच्या मुलाची विराटशी ओळख करून देत आहे. त्यावेळी विराट सांगतो की तो त्याला बाहेर भेटला आहे. त्यानंतर पाँटिंग आणि विराट हलकी फुलकी चर्चा करताना दिसतात. यावेळी फ्लेचरही पाँटिंगच्याच्या शेजारी उभा असलेला दिसतो.

पाँटिंग आणि विराटच्या भेटीच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगली पसंती दाखवली असून लाखो लोकांनी इंस्टाग्रामवर लाईक्स दिले आहेत. तसेच या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

दरम्यान, विराट आणि पाँटिंग दिग्गज खेळाडूंपैकी एक गणले जातात. काही महिन्यांपूर्वीच विराटने पाँटिंगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. पाँटिंगने 71 शतके केली आहेत, तर विराटने 75 शतके केली आहेत. या यादीत विराट आणि पाँटिंगच्या पुढे अव्वल क्रमांकावर 100 शतकांसह सचिन तेंडुलकर आहे.

दिल्लीला पहिल्या विजयाची प्रतिक्षा

दरम्यान, आयपीएल 2023 बद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली कॅपिटल्सने आत्तापर्यंत चार सामने खेळले असून एकाही सामन्यात अद्याप त्यांना विजय मिळवता आलेला नाही. तसेच आरसीबीने तीन सामने खेळले असून त्यांनी पहिला सामना जिंकला होता, मात्र त्यांनतरच्या दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inter Kashi I League Trophy: आय-लीग ‘ट्रॉफी’चा घोळ संपेना! इंटर काशीला नवीन करंडक प्रदान; चर्चिल ब्रदर्सचा संताप

Kane Williamson Retirement: केन विल्यमसनचा T20 क्रिकेटला अलविदा, कसोटी क्रिकेटवर करणार लक्ष केंद्रीत; म्हणाला, "युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ"

Goa Road Tender: रस्ता एक, दोन वेगवेगळ्या निविदा! 37 चे अचानक झाले 146 कोटी; गोव्यातील 'या' रस्त्याच्या कामावरून उलटसुलट चर्चा..

Goa News Today Live Updates: डिचोलीत भीषण अपघात! जीपगाडीची झाडाला धडक; कर्नाटकमधील तिघे गंभीर जखमी

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

SCROLL FOR NEXT