Virat Kohli 10th Marksheet: भारतात दहावी-बारावीच्या परिक्षांना मोठे महत्त्व दिले जाते. अनेकदा आपल्याला या परिक्षांमधील गुणांबद्दल विचारणाही केली जाते. तसेच आपल्यातील अनेकांना मोठमोठ्या सेलिब्रेटिंना या बोर्डाच्या परिक्षांमध्ये किती गुण मिळाले असतील, असा प्रश्नही पडला असेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चक्क भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने स्वत:च त्याचा दहावीच्या बोर्डाचा निकाल शेअर केला होता. याबरोबरच त्याने एक खास कॅप्शनही टाकले होते.
त्याने शेअर केलेल्या निकालानुसार विराट 2004 साल दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याने झेवियर कॉन्व्हेंट स्कूल, पश्चिम विहार येथून शालेय शिक्षण घेतले आहे. तसेच त्याच्या गुणपत्रिकेत इंग्लिश, हिंदी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या गुणांचा उल्लेख आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे क्रीडा या विषयाबद्दल त्याच्या निकालामध्ये उल्लेख नाही. हीच गोष्ट विराटने त्याचा निकाल कू या सोशल मीडिया साईटवर शेअर करताना टाकलेल्या कॅप्शनमध्ये अधोरेखीत केली आहे.
त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'हे किती विचित्र आहे ना की तुमच्या गुणपत्रिकेत कमीत कमी दिसणार्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वात सर्वाधिक दिसतात.'
विराटने शेअर केलेल्या गुणपत्रिकेनुसार त्याला इंग्लिशमध्ये 83, हिंदीमध्ये 75, गणितामध्ये 51, विज्ञान आणि तंत्रज्ञानात 55, समाजशास्त्रात 81 आणि माहिती-तंत्रज्ञानात 58 गुण मिळाले होते.
दरम्यान, विराटने पुढे 12 वी पर्यंतचेच शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याला क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत असताना पुढील शिक्षण घेता आले नाही.
विराट भारताच्या दिग्गज फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 111 कसोटी सामन्यांमध्ये 49.29 च्या सरासरीने 8676 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 288 वनडे सामन्यांमध्ये 58.04 च्या सरासरीने 13525 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 78 शतके केली आहेत. तो सचिन तेंडुलकरनंतर 78 आंतरराष्ट्रीय शतके करणारा दुसराच खेळाडू आहे.
तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने 237 सामन्यांमध्ये 37.25 च्या सरासरीने 7263 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.