Virat Kohli: कोहलीचं 'कवी' रुप! अवघे 8 शब्द अन् विराटनं केली प्रेरणादायी कविता, पाहा Video

विराट कोहलीने त्याला दिलेल्या 8 शब्दातून एक प्रेरणादायी कविता केली असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli write a Poem: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा नेहमीच त्याच्या मैदानातील खेळाबरोबरच मैदानाबाहेरील गोष्टींमुळेही चर्चेत असतो. नुकतीच विराटची एक कविता चांगलीच चर्चेत आली आहे. विराट सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 हंगामात खेळण्यात व्यस्त आहे. याच दरम्यान त्याने एक कविता केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रेझेंटर मिस्टर नॅग्स म्हणजेच दानिश सैतने त्याला काही शब्द दिले, त्यातून विराटला कविता करायची होती. विशेष म्हणजे विराटने दिलेल्या शब्दांमधून कविता केलीही.

Virat Kohli
IPL 2023: टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेला 'कॅप्टन' घेणार Gujarat Titans संघात विलियम्सनची जागा

त्याला हे 8 शब्द इंग्लिंश भाषेतून दिले होते. त्याला शब्द देण्यात आले होते की फायर, बॅट, पिकल, डक, ट्रीप, टाईड, मॅन आणि 49. या शब्दांमधून विराटने इंग्लिशमध्ये एक प्रेरणादायी कविता तयार केली आहे.

त्याने तयार केलेल्या कवितेचे मराठीत अर्थ होतो की 'तुमच्या इच्छा पूर्ण करा, तुमच्या मनात अग्नी पेटवा. कठीण काळात फलंदाजी करत राहा. कधीतरी 263 होती, तर कधी 49 होती. आयुष्यात तुम्ही कठीण परिस्थितीतही सापडाल. पण तुम्हाला गुदगुल्या होतायेत असे हसा. तुम्ही कधी 100 कराल तर कधी डकवर आऊट व्हाल, पण आयुष्य पुढे जात राहिल, तुम्ही थांबू नका.'

विराटने ही कविता केलेला व्हिडिओ आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट मिस्टर नॅग्सच्या अनेक गमतीशीर प्रश्नांनाही उत्तर देताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Virat Kohli
IPL 2023: केकेआरला दिलासा! 2.8 कोटीत टीममध्ये सामील झाला इंग्लंडचा धडाकेबाज ओपनर

विराटची दमदार सुरुवात

विराटने आयपीएल 2023 ची दणक्यात सुरुवात केली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना नाबाद 82 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसबरोबर 148 धावांची भागीदारी केली होती. फाफ डू प्लेसिसने 73 धावांची खेळी केली होती. हा सामना आरसीबीने 8 विकेट्सने जिंकला होता.

आता आरसीबीला पुढील सामना 6 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध इडन गार्डन्सवर खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com