Gautam Gambhir Vs Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat vs Gambhir: भांडणावेळी नक्की विराट-गंभीरमध्ये काय झालेला संवाद? समोर आले सत्य

आयपीएल २०२३ मध्ये १ मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान विराट आणि गंभीरमधील भांडणावेळी नक्की काय संभाषण झाले होते, याबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli and Gautam Gambhir Fight: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघात सामना झाला होता. हा सामना मैदानातील कामगिरीपेक्षा बेंगलोरचा खेळाडू विराट कोहलीचे लखनऊचा खेळाडू नवीन उल हक आणि मार्गदर्शन गौतम गंभीर यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे बराच चर्चेत राहिला.

बेंगलोरने या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, हा सामना सुरु होता, तेव्हा बेंगलोरने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना लखनऊकडून अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक फलंदाजी करताना बेंगलोरकडून क्षेत्ररक्षण करत असलेला विराटचे त्यांच्याशी शाब्दिक वाद झाले.

त्यानंतर हा वाद आणखी वाढला. सामना झाल्यानंतरही विराट आणि नवीन यांच्या वाद झाले. तसेच विराटचे काईल मेयर्सबरोबर संभाषणादरम्यान गंभीरने त्याला दूर नेले, परंतु नंतर गंभीर आणि विराट यांच्यातही कडाक्याची भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, त्यांच्यात नक्की काय संभाषण झाले होते. याबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने, जो त्यावेळी डग-आउटमध्ये होता, त्याने पीटीआयला काहीप्रमाणात माहिती दिली आहे. त्याने सांगितले की 'तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल की मेयर्स आणि विराट एकत्र चालत होते. त्यावेळी मेयर्सने विराटला विटाकले की तो सातत्याने त्यांना डिवचत का होता. त्यावर विराटने त्याला विचारले की तो त्याच्याकडे का पाहात होता?'

'त्याआधी अमित मिश्राने पंचांकडे विराट सातत्याने नवीनला उकसवत असल्याची तक्रार केली होती. गौतमला कळाले होते की गोष्टी बिघडू शकतात, म्हणून त्याने मेयर्सला मागे खेचले आणि त्याला विराटने कमेंट केल्यावर कोणतेही संभाषण न करण्यास सांगितले. पण त्यानंतर तापलेलं वातावरण बालिशपणाचे होते.'

त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की 'गौतमने विचारले की तू काय बोलत आहेस बोल. त्यावर विराटने उत्तर दिले की मी तुम्हाला काहीच बोललो नाही, तर तुम्ही मध्ये का येत आहात. त्यानंतर गौतमने उत्तर देताना सांगितले की तू जर माझ्या खेळाडूंना बोलत आहे, म्हणजे तू माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आहेत. विराटने त्यावर प्रतिउत्तर दिले की तर मग तुमच्या कुटुंबाला सांभाळून ठेवा. ते दोघे वेगळे होण्यापूर्वी गंभीरने अखेरचे उत्तर दिले की आता तू मला शिकवणार आहेस का?'

दरम्यान, विराट आणि गंभीर यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही 2013 साली जेव्हा गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता आणि विराट उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक होता, तेव्हा एक आयपीएल सामन्यादरम्यानच दोघांमध्ये वाद झाले होते.

दरम्यान, 1 मे रोजी झालेल्या वादामुळे आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयकडून कारवाई झाली आहे. विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तर नवीनवर सामनाशुल्काच्या 25 टक्के दंड झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT