Umpire's Call  Dainik Gomantak
क्रीडा

DRS मधील अंपायर्स कॉल म्हणजे नक्की काय? केव्हा केला जातो वापर, जाणून घ्या

Umpires Call in DRS: क्रिकेटमध्ये पायचीतच्या निर्णयासाठी डीआरएस महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अशा रिव्ह्युवेळी बऱ्याचदा अंपायर्स कॉलही निर्णयक ठरतो.

Pranali Kodre

What is umpire’s call and how it works in cricket?

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये सुरू आहे. या सामन्यादरम्यानच नाही, तर या मालिकेत अनेकदा डीआरएसचा (Decision Review System) वापर करण्यात आला आहे.

त्यातही बऱ्याचदा पायचीतच्या निर्णयासाठी डीआरएस महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अशा रिव्ह्युवेळी बऱ्याचदा अंपायर्स कॉलही निर्णयक ठरतो. याबद्दलच खुप वेळा क्रिकेट वर्तुळात चर्चा होत असते.

डीआरएसचा समावेश क्रिकेटमध्ये 2009 मध्ये करण्यात आला. तेव्हापासून अंपायर्स कॉल हा शब्द क्रिकेटमध्ये प्रचलितही झाला. पण अनेकांना माहित नाही की अंपायर्स कॉलचे काम कसे चालते.

खूपवेळा डीआरएसमध्ये पायचीतच्या निर्णयासाठी अंपायर्स कॉलचा उपयोग केला जातो. म्हणजेच जेव्हा अंपायर्स कॉल असा निर्णय दिला जातो, तेव्हा फलंदाजांच्या बाद किंवा नाबाद बाबात मैदानावरील पंच जो निर्णय देतात, तोच कायम केला जातो.

डीआरएसबाबत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ज्यावेळी पायचीतचा निर्णय देण्यात येत असतो, तेव्हा बॉल ट्रॅकिंगसाठी हॉक-आय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यातून तीन झोनमध्ये बॉल ट्रॅकिंग पाहिले जाते. यामध्ये चेंडूचा टप्पा आणि दिशाही महत्त्वाची ठरते.

दरम्यान, पायचीतसाठी जे तीन झोन महत्त्वाचे असतात ते म्हणजे पिचिंग, इम्पॅक्स आणि विकेट.

पिचिंग

ज्यावेळी पायचीतसाठी अपील झालेला चेंडू पाहिला जातो, तेव्हा पहिला पिचिंग झोन पाहिला जातो, म्हणजेच चेंडूचा टप्पा कुठे पडला आहे. जर चेंडूचा टप्पा स्टंपच्या लाईनमध्ये किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर असेल, तर लाल लाईट लागते. म्हणजेच फलंदाज बाद असू शकतो असा त्याचा अर्थ होतो. तसेच जर चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर असेल, तर फलंदाज नाबाद राहातो.

इम्पॅक्ट

इम्पॅक्ट झोन म्हणजे चेंडूचा टप्पा योग्य पडल्यानंतर तो चेंडू आधी पॅडला लागला आहे की बॅटला लागला आहे, हे पाहिले जाते.

जर पॅडला चेंडू आधी लागला असेल आणि चेंडूची दिशा स्टंपच्या लाईनमध्ये असेल, तर फलंदाज बाद असू शकतो असे समजून लाल लाईट लागते. जर बॅटला आधी चेंडू लागला असेल, किंवा चेंडूची दिशा ऑफ स्टंप किंवा लेग स्टंपच्या बाहेर असेल, तर फलंदाजाला नाबाद दिले जाते.

विकेट

पायचीतचा निर्णय देताना विकेटचा झोन सर्वात महत्त्वाचा असतो. यामध्ये तिन्ही स्टंपच्या बाहेरच्या कडा आणि बेल्सच्या वरच्या कडांपर्यंत भागाचा विचार केला जातो. यात पॅडने चेंडू आडवला गेला असल्याने चेंडू स्टंपला लागला असता की नाही, याचा केवळ अंदाज लावलेला असतो.

जर अंदाजानुसार चेंडू स्टंपला लागत असेल, तर फलंदाज बाद होतो. पण यात काही अटीही आहेत आणि यातच अंपायर्स कॉल महत्त्वाचा ठरतो.

Umpire's Call

अंपायर्स कॉल कधी वापरला जातो?

पायचीतचा निर्णय जेव्हा दिला जातो, तेव्हा पिचिंग झोनसाठी अंपायर्स कॉल लागू होत नाही. जर चेंडू 50 टक्क्यापेक्षाही जास्त या झोनमध्ये नसेल, तर फलंदाजाला नाबाद दिले जाते. दरम्यान, इम्पॅक्ट आणि विकेट झोनमध्ये अंपायर्स कॉल महत्त्वाचा असतो.

जर इम्पॅक्स झोन तपासताना जर रिव्ह्यूमध्ये चेंडू आधी बॅटला की पॅडला लागला आहे, हे स्पष्ट होत नसेल, तर मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जातो. तसेच जर चेंडू स्टंपच्या लाईनमध्ये आहे की नाही हे देखील स्पष्ट होत नसेल, तर अंपायर्स कॉल म्हणजेच मैदानावरील पंचांचाच निर्णय अंतिम ठरतो.

यानंतरचा विकेट झोन बऱ्याचदा वादाचा विषयही ठरतो, कारण हॉक-आय तंत्रज्ञानातही चेंडू स्टंपला लागू शकतो की नाही, याचा अंदाजच लावलेला असतो. त्यामुळे हे अचूकच असेल, असे नसते.

त्यामुळे जर चेंडू 50 टक्क्यापेक्षा अधिक स्टंपला लागत असेल, म्हणजे विकेटच्या झोनमध्ये असेल, तर फलंदाजाला बाद दिले जाते. पण तर 51 ते 99 टक्के चेंडू विकेट झोनच्या बाहेर असेल, तर अंपायर्स कॉल दिला जातो.

यामागे असे कारण सांगितले जाते की जर 50 टक्क्यापेक्षा अधिक चेंडू विकेटझोनमध्ये असेल, तर तो स्टंपवर जाण्याची खात्री अधिक असते. पण जर तसे नसेल, तर कदाचीत तो चेंडू विकेटझोनच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. त्याचमुळे अंपायर्स कॉलचा वापर केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT