IPL
IPL Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: नक्की काय आहे 'इम्पॅक्ट प्लेअर'चा नियम? जाणून घ्या सर्वकाही

Pranali Kodre

Impact Player Rule: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजराज टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेपासून आता काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर. या नियमाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. याचबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ.

इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर १२ वा खेळाडू. म्हणजे नाणेफेकीनंतर दोन्ही संघांना प्लेइंग इलेव्हन घोषित करावी लागणार आहे. याबरोबरच आणखी ४ खेळाडूंची नावे द्यावी लागणार आहेत, त्या ४ खेळाडूंमधील एक जण गरज लागेल तेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूचा बदली खेळाडू म्हणून सामन्यात प्रवेश करू शकतो.

पण, संघ इम्पॅक्ट प्लेअरचा नियम संघ डावाच्या १४ व्या षटकापूर्वीच करू शकतात. विकेट गेल्यानंतर, षटक संपल्यानंतर किंवा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर किंवा जर फलंदाज रिटायर झाला, तर इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वापरून खेळाडूला बदलता येऊ शकतो.

त्याचबरोबर कोणत्याही अडथळ्यामुळे जर सामना १० षटकांपेक्षा कमी करण्यात आला, तर हा नियम लागू होणार नाही. हा नियम लागू करण्यासाठी मैदानातील पंच दोन्ही हात वर करून आणि मुठ बंद करून क्रॉस करतील.

दरम्यान, ज्या खेळाडूला बदली केले गेले आहे, त्या खेळाडूला नंतर कोणतीही भूमिका निभावता येणार नाही. तसेच आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक संघ प्लइंग इलेव्हनमध्ये केवळ ४ परदेशी खेळाडूंनाच संधी देऊ शकतो. त्यामुळे जर आधीच प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ परदेशी खेळाडू असतील, तर इम्पॅक्ट प्लेअर भारतीयच असणे आवश्यक आहे. जर प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी परदेशी खेळाडू असतील, तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी खेळाडूला वापरता येणे शक्य आहे.

गोलंदाजीसाठी जर इम्पॅक्ट प्लेअरला उतरवले, तर तो त्याच्या कोट्यातील पूर्ण ४ षटके गोलंदाजीही करू शकतो. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत इम्पॅक्ट प्लअरचा नियम वापरण्यात आला होता. तसेच बीग बॅश लीग स्पर्धेतही हा नियम वापरण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT