MS Dhoni: कॅप्टनकूलची यंदा अखेरची IPL? रोहित म्हणतोय, 'गेल्या 2-3 वर्षांपासून ऐकतोय...'

IPL 2023 नंतर धोनी निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू असून याबद्दल रोहित शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.
MS Dhoni | Rohit Sharma
MS Dhoni | Rohit SharmaDainik Gomantak

Rohit Sharma on MS Dhoni last IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा आयपीएल हंगाम चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी याचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा आहे. याबद्दल आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण त्याने त्यानंतरही आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले, महत्त्वाचे म्हणजे त्याने आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर 2021 मध्ये सीएसकेचे नेतृत्व करताना आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले. पण आता धोनी 16 व्या हंगामात शेवटचे खेळताना दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

MS Dhoni | Rohit Sharma
MS Dhoni: बॅटिंग, विकेटकिपिंग, कॅप्टन्सी तर केलीच आता 'थाला' बनलाय पेंटर, Video Viral

याबद्दल रोहित शर्मालाही मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहितने उत्तर दिले की 'मला माहित नाही की हा त्याचा शेवटचा हंगाम आहे की नाही. पण मी हेच गेल्या 2-3 वर्षांपासून ऐकत आहे. पण अद्यापही तो पूर्ण तंदुरुस्त आहे आणि क्रिकेट खेळत आहे. तो अजूनही पुढे खेळू शकतो.'

धोनीने यापूर्वी म्हटले होते की त्याला चेन्नईतील चाहत्यांसमोर अखेरचे खेळायचे आहे. त्याचमुळे सध्या त्याच्या अखेरच्या हंगामाची चर्चा सुरू आहे. कारण तब्बल तीन वर्षांनंतर सीएसके संघ चेन्नईत त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळताना दिसणार आहे. गेल्या तीन वर्षात सीएसकेला कोरोनाच्या कारणाने चेन्नईत खेळता आले नव्हते.

धोनी सीएसके संघातील प्रमुख खेळाडू राहिला आहे. सीएसकेने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व हंगामात धोनीने संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 2010, 2011, 2018 आणि 2021 अशा चार वर्षी आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.

MS Dhoni | Rohit Sharma
IPL: पडदा उठला! CSK कॅप्टन्सीवरून नाराज झालेला जडेजा, मग कामी आला कॅप्टनकूलचा फंडा

आता 2023 हंगामातही धोनीच संघाचे नेतृत्व करणार की दुसऱ्या कोणत्या खेळाडूकडे नेतृत्व सोपवणार, याबद्दल अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. या हंगामात सीएसकेला पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. हा सामना आयपीएल 2023 स्पर्धेतील सलामीचा सामना आहे.

तसेच सीएसके चेन्नईत पहिला सामना 3 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळणार आहे. तर सीएसके आणि मुंबई इंडियन्स संघ 8 एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com