Kolkata Knight Riders Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: KKR ची मोठी घोषणा! मायदेशी परतलेल्या विकेटकिपरची जागा घेणार वेस्ट इंडिजचा धाकड

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 साठी मायदेशी परतलेल्या विकेटकिपरच्या जागेवर बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

KKR name Johnson Charles as replacement for Litton Das: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात असून सर्व संघामध्ये गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकांमध्ये राहून प्लेऑफला पोहोचण्यासाठी चूरस पाहायला मिळत आहे. अशातच कोलाकाता नाईट रायडर्स संघात वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्स या खेळाडूचा समावेश झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सला खेळाडूंच्या दुखापतीचा आणि खेळाडूंनी माघार घेतल्याचा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाताच्या संघातील बांगलादेशी यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास मायदेशी परतला होता. त्याला कौटुंबिक कारणामुळे तातडीने घरी परतावे लागले होते. आता तो पुन्हा हा हंगाम खेळण्यासाठी परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचमुळे कोलकाताने त्याचा बदली खेळाडू म्हणून जॉन्सन चार्ल्सला संघात संधी दिली आहे. लिटन दास आयपीएल 2023 साठी राष्ट्रीय संघाप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे उशीरा कोलकाता संघात सामील झाला होता. त्यानंतर त्याने 20 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला होता. हा एकमेव सामना त्याने या हंगामात खेळला. त्यानंतर तो 28 एप्रिलला मायदेशी परतला.

दरम्यान, याआधी बांगलादेशच्याच शाकिब अल हसननेही आयपीएल 2023 मधून माघार घेतली होती. तो देखील या हंगामासाठी कोलकाताचा भाग होता. तसेच कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे या हंगामातून आधीच बाहेर झाला होता.

चार्ल्सची टी20 कामगिरी

चार्ल्सने आत्तापर्यंत वेस्ट इंडिजसाठी 41 टी20 सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये 971 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. तसेच चार्ल्स 2012 आणि 2016 टी20 वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिज संघाचाही भाग होता. तसेच चार्ल्सने नुकतेच वेस्ट इंडिजकडून मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना शतकी खेळी केली होती.

त्याने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत एकूण 224 टी20 सामने खेळले असून यामध्ये त्याने 5607 धावा केल्या आहेत. त्याला कोलकाताने 50 लाखांच्या किमतीत संघात सामील करून घेतले आहे.

कोलकाताची कामगिरी

आयपीएल 2023 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने आत्तापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यातील 3 सामनेच जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे, तर 6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे 46 सामन्यांनंतर कोलकाता गुणतालिकेत 6 गुणांसह 8 व्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT