India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND T20i: कसोटी, वनडेनंतर आता भारत-वेस्ट इंडिज संघात 5 टी-20 सामन्यांचा थरार! पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत असून कुठे आणि केव्हा सामने होणार आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

West Indies vs India T20I Series Details: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवले. दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने, तर 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज संघात 5 टी20 सामन्यांची मालिका रंगणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज संघात टी२० मालिकेला आजपासून म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना त्रिनिदाद मधील ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी मैदानात खेळला जाणार आहे.

त्यानंतर 6 आणि 8 ऑगस्ट रोजी होणारा दुसरा आणि तिसरा सामना गयाना मधील नॅशनल स्टेडियम येथे खेळवला जाणार असून चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेतील फ्लोरिडामधील ब्रोवार्ड काउंटी स्टेडियममध्ये अनुक्रमे 12 आणि 13 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.

या सर्व 5 सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.  या मालिकेतील सामने भारतीय चाहत्यांना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहाता येणार आहेत. तसेच या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा आणि फॅनकोड ऍपवरही करण्यात येणार आहे.

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत 25 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 17 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तसेच 7 सामने वेस्ट इंडिजने जिंकले. त्याचबरोबर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

तसेच या दोन संघात झालेल्या गेल्या 5 टी20 मालिकेत भारतीय संघानेच विजय मिळवला आहे. 2017 नंतर वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध टी20 मालिका जिंकता आलेली नाही.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

  • वेस्ट इंडिज - रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅकॉय, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमस.

टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

  • 3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

  • 6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

  • 8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

  • 12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

  • 13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT