Sanju Samson | Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson: सूर्यानं दाखवलं सॅमसनसाठी मोठं मन? चाहत्यांमध्ये 9 क्रमांकाच्या जर्सीने चर्चेला उधाण

Suryakumar Yadav: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान सूर्यकुमारमुळे संजू सॅमसनची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली.

Pranali Kodre

Suruakumar Yadav wearing Sanju Samson jersey: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात गुरुवारी पहिला वनडे सामना पार पडला. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र असे असले तरी त्याची या सामन्यात जोरदार चर्चा झाली. भारतीय संघव्यवस्थापने या सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून इशान किशनला पहिली पसंती दिली. त्यामुळे सॅमसनला बाहेर बसावे लागले.

मात्र, असे असले तरी या सामन्यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव सॅमसनची 9 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. सूर्यकुमारने सॅमसनच्या नावाची आणि 9 क्रमांकाची जर्सी घालूनच क्षेत्ररक्षण केले, तसेच तो फलंदाजीलाही हीच जर्सी घालून उतरला होता.

दरम्यान, सूर्यकुमारने सॅमसनची जर्सी घालण्यामागील खरे कारण अद्याप समोर आले नसले, तरी चाहत्यांनी यामागे विविध कयास लावले आहेत.

काही चाहत्यांच्या मते सॅमसनसाठी सूर्यकुमारने मोठे मन दाखवत त्याची मैदानातील कमी त्याची जर्सी घालून भरून काढली. तर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की सॅमसन बाहेर बसलेला सूर्यकुमारलाही पाहावलं नाही, त्यामुळे त्याने ही जर्सी घातली.

काही चाहत्यांनी 'नाराजी दूर करण्यासाठी संघव्यवस्थापनाने संजूची जर्सी सूर्याला घालायला लावली', अशा प्रकारच्या मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. दरम्यान, काही चाहत्यांनी चांगल्या कामगिरीनंतरही सॅमसनला न खेळवण्याबद्दल संघव्यवस्थापनावर टीकाही केली आहे.

संजू सॅमसनने त्याच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत 11 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 66 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 330 धावा केल्या आहेत.

भारताने जिंकला सामना

दरम्यान, पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकात 114 धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने 22.5 षटकात 115 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले आणि सामन्यात विजय मिळवला. भारताने या विजयामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना 29 जुलैला बार्बाडोसलाच खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT