Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: गिलवर चढला कॅरेबियन फिव्हर! लाईव्ह सामन्यात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल

IND vs WI: पहिल्या कसोटीत शुभमन गिल मस्तीमध्ये डान्स करताना दिसला.

Pranali Kodre

Shubman Gill dance during 1st Test at Dominica: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलवर कॅरेबियन फिव्हर चढल्याचे दिसले. तो मस्तीमध्ये डान्स करताना दिसला.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की पहिल्या डावातील 63 षटके पूर्ण झाली आहेत. यावेळी प्रथम फंलदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने 9 विकेट्स गमावल्या आहेत आणि त्यांचे 148 धावा झाल्या आहेत.

यावेळी वेस्ट इंडिजकडून राहकिम कॉर्नवॉल आणि जोमेल वॉरिकन फलंदाजी करत आहेत. त्याचवेळी 64 वे षटक सुरू होण्यापूर्वी गिलने मस्तीमध्ये ठेका धरला आणि तो काही डान्स स्टेप्स करू लागला. त्याचा हा डान्सचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

दरम्यान, 65 व्या षटकात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून अथानाझने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 20 धावा केल्या.

या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून या डावात कोणालाही 20 धावांचाही टप्पा गाठता आला नाही. भारताकडून अश्विनव्यतिरिक्त रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट् घेतली.

तसेच भारताने पहिल्या दिवसाखेर 23 षटकात बिनबाद 80 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 70 धावांनी मागे आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या दिवशी 65 चेंडूत 30 धावा करून नाबाद आहे. तसेच पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल 73 चेंडूत 40 धावा करून नाबाद आहे.

गिल खेळणार तिसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, या सामन्यात गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. तो यापूर्वी सलामीला फलंदाजी करताना दिसला होता. पण सलामीला डावे-उजवे संमिश्रण होण्यासाठी कर्णधार रोहित शर्माबरोबर यशस्वी जयस्वालने फलंदाजी केली.

तसेच रोहितने सामन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गिलने स्वत:हून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता त्याची ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT