Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: हिटमॅनची बॅट बरसली! दमदार शतकासह 3 मोठ्या रेकॉर्ड्सलाही घातली गवसणी

Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहित शर्माने शतकी खेळी करण्याबरोबरच गावसकर, विराटसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st Test, Rohit Sharma Records: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी शतकी खेळी केली. दरम्यान, रोहितने शतकी खेळी करताना काही मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

रोहितने या सामन्यात पहिल्या डावात यशस्वी जयस्वालसह 229 धावांची विक्रमी भागीदारी केली. ही वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली. दरम्यान, रोहित शर्मा 221 चेंडूत 103 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले.

विराटनंतर दुसराच खेळाडू

रोहितने ही शतकी खेळी करताना कसोटी कारकिर्दीत 3500 धावा करण्याचा टप्पाही पार केला. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही क्रिकेट प्रकारात 3500 धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहलीनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.

रोहितने त्याच्या कारकिर्दीत वनडेमध्ये 9825 धावा केलेल्या आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 3853 धावा केल्या आहेत आणि आता त्याने कसोटीतही 86 डावांत 3540 धावा केल्या आहेत.

विराटबाबत सांगायचे झाल्यास त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 4008 धावा, वनडेत 12898 धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत 8500 हून अधिक धावा केल्या आहेत.

गावसकरांना टाकले मागे

तसेच सलामीवीर म्हणून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 हून अधिक धावांची खेळी करण्याची ही 102 वी वेळ होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले आहे.

गावसकर आणि सेहवाग यांनी 101 वेळा भारतासाठी सलामीला फलंदाजी करताना 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने सलामीला खेळताना 120 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

भारताकडून सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे सलामीवीर

120 वेळा - सचिन तेंडुलकर (342 डाव)

102 वेळा - रोहित शर्मा (308 डाव)

101 वेळा - सुनील गावसकर (286 डाव)

101 वेळा - विरेंद्र सेहवाग (388 डाव)

स्मिथची बरोबरी

रोहितचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 44 वे शतक आहे. त्यामुळे सर्वाधिक शतके करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सक्रिय खेळाडूंमध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. स्मिथनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 44 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सक्रिय खेळाडू

  • 75 शतके - विराट कोहली

  • 46 शतके - जो रुट

  • 45 शतके - डेव्हिड वॉर्नर

  • 44 शतके - रोहित शर्मा

  • 44 शतके - स्टीव्ह स्मिथ

भारताचे सामन्याच वर्चस्व

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत भारतीय संघाचे पहिल्या दोन्ही दिवशी वर्चस्व राहिल्याचे दिसले.

या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर सलामीवीर यशस्वी जयस्वाल 143 धावांवर आणि विराट कोहली 36 धावांवर नाबाद आहेत.

तसेच वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT