Ravindra Jadeja - R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja - R Ashwin: जड्डू-अश्विन जोडगोळीच्या 500 विकेट्स! आता कुंबळे-हरभजनचा विक्रम धोक्यात

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत आर अश्विन आणि रविंद्र जडेजा जोडीच्या निशाण्यावर कुंबळे आणि हरभजनचा विक्रम असणार आहे.

Pranali Kodre

R Ashwin-Ravindra Jadeja 500 Test Wickets as a Pair:

क्रिकेटमध्ये भागीदारी ही फक्त फलंदाजीतच होते असं नाही, तर गोलंदाजांची जोडीही प्रतिस्पर्ध्यांसाठी अनेकदा धोकादायक ठरते. आशा अनेक गोलंदाजांच्या जोड्या आहेत, ज्यांनी मिळून प्रतिस्पर्धी फलंदाजांना संघर्ष करायला लावला आहे. यातीलच एक जोडी म्हणजे आर अश्विन आणि रविंद्र जडेजा. त्यांच्या नावावर एक मोठा विक्रमही झाला आहे.

भारताचे फिरकीपटू अश्विन आणि जडेजा गेली अनेकवर्षे एकत्र खेळत आहेत. या दोघांनी मिळून आता कसोटी क्रिकेटमध्ये एकत्र 500 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

सध्या भारत आणि वेस्ट इंडिज संघात त्रिनिदादला कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात अश्विन आणि जडेजा दोघेही खेळत आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील पहिल्या दोन विकेट्स अश्विनने घेतल्या.

याबरोबरच अश्विन आणि जडेजा 49 व्या कसोटीत एकत्र खेळत असताना या दोघांच्या मिळून 500 कसोटी विकेट्स पूर्ण झाल्या. यातील 274 विकेट्स अश्विनने आणि 226 विकेट्स जडेजाने घेतल्या आहेत.

त्यामुळे कसोटीत मिळून 500 विकेट्सचा टप्पा पार करणारी अश्विन आणि जडेजा यांची दुसरीच भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांनी 54 कसोटी सामने एकत्र खेळताना 501 विकेट्स मिळून घेतल्या आहेत. आता हरभजन आणि कुंबळे यांच्या जोडीला मागे टाकण्याचीही संधी अश्विन आणि जडेजाला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत अखेरच्या दिवशी जर अश्विन आणि जडेजा यांनी अजून दोन विकेट्स घेतल्या, तरी ते कुंबळे आणि हरभजनच्या जोडीच्या 501 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकू शकतात.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या जोड्यांच्या यादीत अव्वल क्रमांकावर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड आहे. या जोडीने आत्तापर्यंत 137 सामन्यांमध्ये 1034 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या जोड्या

  • 1034 विकेट्स - जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड (137 सामने)

  • 1001 विकेट्स - शेन वॉर्न - ग्लेन मॅकग्रा (104 सामने)

  • 895 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन- चामिंडा वास (95 सामने)

  • 762 विकेट्स - कर्टली अँब्रोस - कर्टनी वॉल्श (95 सामने)

  • 612 विकेट्स - मिचेल स्टार्क - नॅथन लायन (77 सामने)

  • 559 विकेट्स - वासिम आक्रम - वकार युनूस (61 सामने)

  • 547 विकेट्स - शेन पोलॉक - जॅक कॅलिस (93 सामने)

  • 541 विकेट्स - ट्रेंट बोल्ट - टीम साऊथी (65 सामने)

  • 538 विकेट्स - मखाया एन्टीनी - जॅक कॅलिस (93 सामने)

  • 522 विकेट्स - डेल स्टेन - मॉर्ने मॉर्केल (62 सामने)

  • 501 विकेट्स - हरभजन सिंग - अनिल कुंबळे (54 सामने)

  • 500 विकेट्स - रविंद्र जडेजा - आर अश्विन (49 सामने)*

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT