Ravindra Jadeja on MS Dhoni: 'आयपीएल 2023 विजेतेपद धोनीसाठीच...' जडेजाच्या वक्तव्याने जिंकली कोट्यवधींची मनं

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 स्पर्धा जिंकल्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने एमएस धोनीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
MS Dhoni Ravindra Jadeja
MS Dhoni Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Updated on

Ravindra Jadeja on MS Dhoni: एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी मध्यरात्री इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पावसामुळे रविवारऐवजी राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी पार पडलेल्या अंतिम सामन्याच चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला 5 विकेट्सने पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले.

या विजेतेपदानंतर चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने केलेल्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

MS Dhoni Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Record: जड्डूचा जलवा! IPL मध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच 'ऑलराऊंडर'

जडेजाची प्रतिक्रिया

आयपीएल 2023 स्पर्धा जिंकल्यानंतर जडेजाने हे विजेतेपद एमएस धोनीला समर्पित केले आहे. तसेच त्याने चेन्नई संघाच्या चाहत्यांचेही आभार मानले.

त्याने सांगितले की 'माझ्या घरच्या चाहत्यांसमोर पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणे शानदार आहे. ते चेन्नई सुपर किंग्सला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. चाहते शानदार होते. ते पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षेत रात्री उशीरापर्यंत थांबले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन.'

तसेच तो धोनीबद्दल म्हणाला, 'मी हा विजय आमच्या संघातील एका खास व्यक्तीला समर्पित करू इच्छितो, तो म्हणजे एमएस धोनी.'

जडेजाने मारला विजयी चौकार

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला 10 धावांची गरज होती.

यावेळी चेन्नईकडून रविंद्र जडेजा मोहित शर्माच्या गोलंदाजीवर अखेरच्या दोन चेंडूत षटकार आणि मग विजयी चौकार मारला. त्यामुळे चेन्नईने या सामना जिंकत विजेतेपही नावावर केले. जडेजा १५ धावांवर नाबाद राहिला.

त्याच्या खेळाबद्दल जडेजा म्हणाला, 'मी फक्त एवढाच विचार केलेला की मला काहीही झाले तरी मोठा फटका खेळायचा आहे. हो, त्यावेळी काहीही होऊ शकले असते. मी सरळ मारण्याचा विचार करत होतो, कारम मोहित स्लोअर बॉल टाकू शकत होता. मी चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक चाहत्याचे अभिनंदन करतो. तुम्ही ज्याप्रकारे पाठिंबा देता, तसा देत राहा.'

MS Dhoni Ravindra Jadeja
Jadeja - Manjrekar: मैत्रीची नवी सुरुवात? एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या दोन क्रिकेटरच्या गळाभेटीनं वेधलं लक्ष

चेन्नईने पाचव्यांदा जिंकले विजेतेपद

या सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच शिवम दुबे 21 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. त्यांनी यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामात विजेतेपद जिंकले आहे. यासह चेन्नईने मुंबईच्या पाच आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com